तरुण भारत

शिवसेनेच्या सहकार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत; अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया


पुणे \ ऑनलाईन टीम

डॉ. अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी टोला लगावला आहे.

पुण्याच्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचे बळे बळे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत आणि आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवले आहे. अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत? असा सवालही कान्हेरे यांनी विचारला आहे. अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की होते असे, अहो कोल्हे, ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरु नका, असा टोला किशोर कान्हेरे यांनी लगावला आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. तुम्ही कशाला फार विचार करता, तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण, दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका” अशा शब्दात किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल चढवला.

Related Stories

आपत्तीच्या काळात सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाची : सौरभ राव

Rohan_P

शहरात बांधकामांना नवीन वर्षात येवू लागली उर्जित अवस्था

Patil_p

बांधकाम सभापतीपद कोणाकडे जाणार?

Patil_p

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान अप्पालाल शेख यांचे निधन

Abhijeet Shinde

MPSCला स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार नव्हे – देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

भाजपच्या ‘त्या’ टीकेला नितीन राऊतांचे प्रतिउत्तर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!