तरुण भारत

कोयना पोलिसांकडून अवैध दारू जप्त

नवारस्ता / प्रतिनिधी : 

पाटण तालुक्यात कोयना विभागातील शिरळ गावच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कोयनानगर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्या ताब्यातील 9 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisements

याप्रकरणी संजय यशवंत कांबळे (वय 46 रा. मळे, कोयनानगर) यांच्याविरोधात कोयनानगर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस कर्मचारी शिवाजी भिसे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरळ ता. पाटण येथील एका हॉटेलसमोर अवैध दारू विक्री होत असल्याची खबर कोयना पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोयना पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून दारू साठा जप्त केला. यामध्ये विदेशी 180 मिली च्या 36 बाटल्या व देशी 180 मिलीच्या 65 बाटल्या अशा 9330 रुपयांच्या 101 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

सातारा : गुरव कुटुंबियाच्या मदतीसाठी पंचायत समितीचे सदस्य सरसावले

datta jadhav

चार मंत्र्यांच्या दौयामुळे तारळी योजनेस चालना : डॉ. येळगावकर

Patil_p

किल्ले पांडवगडाच्या दक्षिण बाजूस तीन प्राचीन लेणी नव्याने उजेडात

Abhijeet Shinde

सातारा : उंब्रज येथील तारळी पुल वळणावर रुग्णवाहिका पलटी ; दोन जखमी

Abhijeet Shinde

श्री.छ.प्रतापसिंह उद्यान पूर्णत्वास नेणारच : खासदार उदयनराजे

Patil_p

सातारा जिल्ह्यातील ११ बालगृहात कोरोनाला नो एण्ट्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!