तरुण भारत

शंतनू मोघे नव्या भूमिकेत

स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’मध्ये दररोज काही ना काही नवे घडत आहे. आता अरूंधती आणि अनिरूद्धच्या घटस्फोटाला अवघा एक आठवडा आहे. आपण जाण्याअगोदर यश आणि गौरीचा साखरपुडा व्हावा ही तिची मनापासूनची इच्छा. या इच्छेला आजी देखील परवानगी देते.  अरूंधतीचा देशमुख कुटुंबातील हा शेवटचा सोहळा. या सोहळ्यात एका नव्या पात्राची एन्ट्री होते.

  ‘समृद्धी’ बंगल्यात गौरी-यशच्या साखरपुडय़ाची जय्यत सुरू आहे. अशावेळी आतापर्यंत कधीच न दाखवलेलं पात्र पहिल्यांदाच सगळ्यांसमोर येणार आहे. आप्पा देशमुख यांचा दुसरा मुलगा आणि अनिरूद्धचा लहान भाऊ अविनाशची या मालिकेत एन्ट्री होत आहे. आतापर्यंत अविनाश देशमुख हे पात्र मालिकेत दाखवण्यात आलं नाही. पहिल्यांदाच अविनाश देशमुख प्रेक्षकांना भेटणार आहे. अभिनेता शंतनु मोघे अविनाश देशमुखचं पात्र साकारत आहे.

Advertisements

Related Stories

राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन

pradnya p

पोरगं मजेतयचे चित्रीकरण पूर्ण

Patil_p

उर्वशी रौतेलाकडून उत्तराखंडला मदत

Patil_p

ब्रिटनच्या एलिझाबेथचा अनोखा विश्वविक्रम

Amit Kulkarni

1962 : द वॉर इन द हिल्स

Patil_p

निक जोनासला मिळाला डिस्चार्ज

Patil_p
error: Content is protected !!