तरुण भारत

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून प्रारंभ होत आहे. हे अधिवेशन 19 (13 ऑगस्टपर्यंत) दिवस चालणार असून अनेक महत्वाची विधेयके संमत होण्याची शक्यता आहे. सरकारी आणि विरोधक या दोघांनीही जोरदार  तयारी केली असून दोन्ही बाजू एकमेकींवर तुटून पडणार आहेत. 

Advertisements

कोरोना लसीकरण, जीवनावश्यक वस्तूंची महागाई, शेतकरी आंदोलन, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, बेरोजगारी आणि मंदावलेली अर्थव्यवस्था या मुद्दय़ांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज आहेत, असे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली होती. या बैठकीत सरकारला वरील मुद्दय़ांवर स्पष्टीकरण विचारण्यात आले होते.

सर्व मुद्दय़ांवर चर्चा

विरोक्षी पक्षांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्दय़ांवर संसद भवनात सविस्तर चर्चा करण्यास सरकार सज्ज आहे. अधिवेशन पूर्णकाळ चालेल याची शाश्वती विरोधी पक्षांनी द्यावी. सरकारलाही आपली बाजू मांडण्याची संधी या अधिवेशनात मिळेल. देशासमोरील सर्व प्रश्नांना सरकारकडून समाधानकारक उत्तरे दिली जातील. भारताच्या जनतेशी आम्ही निष्ठवान असून जनतेच्या समस्या दूर करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

सरकारवर आरोप

कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे, असा आरोप अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी गेल्या चार दिवसांमध्ये केला आहे. लसीकरणाची गती संथ आहे. या आघाडीवर सरकार मागे पडले आहे. तिसऱया उद्रेकाला रोखण्याची कोणती तयारी केली आहे, यासंबंधी स्पष्टता नाही. बेरोजगारीमुळे कोटय़वधी लोकांसमोर उपासमारीची भीती निर्माण झाली आहे, असे अनेक आक्षेप विरोधकांनी घेतलेले असून त्याचे प्रतिबिंब या अधिवेशनात पडणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने दोन्ही बाजूंनी त्याची तयारी चालविली आहे.

बॉक्स

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डा उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या सर्व पक्षांचे नेतेही उपस्थित होते. त्यांच्यात अनुप्रिया पटेल (अपना दल), रामनाथ ठाकूर (संजद), रामदास आठवले (रिपब्लिकन पक्ष), पशुपती पारस (लोकजनशक्ती) व इतरांचा समावेश होता. संसदेत कोणते धोरण अवलंबावे, यावर बैठकीत वि

Related Stories

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक नियमावली जारी; शाळा कॉलेजही राहणार बंद

Sumit Tambekar

धावत्या बसमध्ये 80 फुटांची गॅस पाईप घुसली आरपार; 2 ठार, 12 जखमी

datta jadhav

प्रमोशनच्या आनंदात ड्रिंक

Patil_p

कोणी काय कमावले…

Patil_p

केरळ सरकारच्या वेतन कपात निर्णयाला स्थगिती

Patil_p

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नॉमिनीशी निगडित नियमात बदल

Patil_p
error: Content is protected !!