तरुण भारत

नाटय़कलाकार राजदीप नाईक यांच्या कारगाडीच्या काचा फोडल्या

फोंडा पोलीस स्थानकात तक्रार नोंद

वार्ताहर /सावईवेरे

Advertisements

कलाचेतना वळवईचे संस्थापक सुप्रसिद्ध नाटय़कलाकार राजदीप नाईक यांच्या सावई येथे घरापासून काही अंतरावर पार्क करून ठेवलेल्या कारगाडीचे पाठीमागील काचा फोडल्याची घटना काल रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी फोंडा पोलिस तक्रार नोंदविण्यात आली असून फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहे.

  प्राप्त माहितीनुसार राजदीप नाईक यांनी आपली सेलेरियो कारगाडी जीए 05 एफ 1282 सावई येथे रस्तालगतच नेहमीप्रमाणे शनिवारी पार्क करून ठेवली होती. कोरोना काळात कलाकारांवर उद्भवलेल्या परिस्थिती व त्यासंबंधी सरकारला जाब विचारणारे प्रेश्न सोशयल मिडीयाद्वारे व्हीडीओ प्रसारीत करीत असे. आपल्यापरीने कोरोना काळातही जीवनाश्यक वस्तूचे वाटपही सदर कारगाडीतून करण्यावर भर दिला होता. हल्लीच राज्य सरकारने कलाकारांना देऊ केलेल्या दहा हजार रूपयांच्या आर्थिक मदतीवरही टिपण्dणी केली होती. सदर घटनेची माहिती मिळताच गोव्यातील अनेक नाटय़कलाकारांनी सदर घटनेचा निषेध केला आहे.

  दरम्यान याप्रकरणी राजदीप नाईक यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले भारतात लोकशाही नांदत असून व्हीडीओ सोशल मिडीयावर जारी करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कलाकारांसंबंधी आपला व्हीडीओ जारी झाल्यानंतरच कुणी अज्ञातांती हे कृत्य केलेले आहे. मात्र आपण अशा पाठीमागून वार करणाऱयांना घाबरत नसून समाजाच्या हिताचे काम सदैव करीत राहिल.

Related Stories

कोरोनाच्या उंच्चाकानंतरही फोंडय़ात विनामास्क व सामाजिक अंतराचा फज्जा

Amit Kulkarni

खाणी सुरु करा, अन्यथा अवलंबितांची जाबाबदारी घ्या

Omkar B

केवळ दैव बलवत्तर म्हणून दोन नगरसेवक वाचले

Patil_p

आल्मेदानी नगरविकासमंत्र्यांवर डागली तोफ

Amit Kulkarni

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या गोवा भेटीवर

Patil_p

सुमूलने दूध संकलन दर कमी केल्याने दुग्ध उत्पादक अडचणीत

Patil_p
error: Content is protected !!