तरुण भारत

वेंगुर्ला रोडवरील ‘त्या’ पुलाची पुनर्बांधणी करा

जुना-अरुंद पूल असल्याने प्रवाशांसाठी ठरतोय धोकादायक

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेळगाव-वेंगुर्ला हा रोड नेहमीच वर्दळीचा आहे. या रस्त्यावरून कोकणात वाहने मोठय़ा प्रमाणात जातात. याचबरोबर गोवा व इतर ठिकाणीही वाहने जात असतात. या रस्त्यावर असलेल्या केंबाळी नाल्यावर हा पूल आहे. त्या पुलाला भेगा पडल्या आहेत. तो कधी कोसळेल याची शाश्वती नाही. तेव्हा तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांतून आणि विविध ठिकाणांच्या ग्रामस्थांतून होत आहे.

सुळगा-हिंडलगाजवळ असलेल्या या पुलावर जोराचा पाऊस झाला तर पाणी येते. हा पूल अत्यंत जुना आहे. तेक्हा अवजड वाहने ये-जा करताना कोसळण्याचा धोका आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम खाते आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या पुलाची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगाव ते महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणारा हा एक महत्त्वाचा रस्ता आहे. याचबरोबर बेळगाव तालुक्मयाच्या पश्चिम भागातील गावांना जोडणारा हा रस्ता असल्यामुळे वर्दळ मोठी असते. मोठी अवजड वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. हिंडाल्कोला येणारे खनिज ट्रक येथूनच येतात. तेव्हा हा पूल कोसळण्यापूर्वी त्यांची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी होत आहे. 

Related Stories

अनगोळच्या स्मशानभूमीची अवस्था दयनीय

Omkar B

वेणुग्राम महिला सायकलिंग रॅली उत्साहात

Amit Kulkarni

कर्नाटकचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा होम क्वारंटाईन ; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

सीमाभागातील साहित्य संमेलन संयोजकांची रविवारी बैठक

Patil_p

कोगनोळी टोलनाक्यावर कडक अंमलबजावणी

Amit Kulkarni

महिन्याभरात पेट्रोल व डिझेल 10 रूपयांनी वधारले

Patil_p
error: Content is protected !!