तरुण भारत

‘अवघा रंग एक झाला’ कार्यक्रम उद्या

लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्राची प्रस्तुती : भक्तिगीत-अभंग कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आयोजित लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत आषाढी एकादशीनिमित्त मंगळवार दि. 20 जुलै रोजी ‘अवघा रंग एक झाला’ या भक्तिगीत-अभंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता लोकमान्य सोसायटीचे युटय़ूब चॅनेल व फेसबुक पेज तसेच तरुण भारत न्यूज युटय़ूब चॅनेल व तरुण भारत न्यूज बेळगाव या फेसबुक पेजवरही हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात पाहता येणार आहे. हा कार्यक्रम पाहू इच्छिणाऱया रसिकांनी 8080942671 या क्रमांकावर मिसकॉल केल्यास त्यांना या कार्यक्रमाची लिंक मिळू शकणार आहे.

दरवषी लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विठ्ठलभक्तांना अभंग व भक्तिगीतांचा सुरेल असा आस्वाद घेता येतो. परंतु यावषी कोरोनामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन घ्यावा लागणार आहे. भक्ती-संगीताची ही परंपरा सुरू राहावी, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन प्रा. अनिल चौधरी यांचे आहे. संगीत दिग्दर्शन श्रीधर कुलकर्णी व संतोष गुरव यांनी केले आहे. यामध्ये श्रीधर कुलकर्णी, अर्चना बेळगुंदी, श्रीवत्स हुद्दार, काजल धामणेकर, अपेक्षा कडले, सोनाली पाटील, अनिस आणि रेहान मुल्ला ही कलाकार मंडळी सहभागी होणार आहेत. संतोष गुरव, वैभव गाडगीळ, स्वाती हुद्दार व योगेश रामदास यांची साथसंगत मिळणार आहे.

या कार्यक्रमाला बेळगाव मराठी भाषाप्रेमी मंडळ (सलग्न संस्था-बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली) यांचे सहकार्य मिळाले आहे. विठ्ठलभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

स्फोटकांच्या वाहतुकीवर पोलिसांची नजर

Amit Kulkarni

जागनूर येथे अनैतिक संबंधातून महिलेचा खून

Patil_p

नव्या स्वरूपातील परींक्षेसाठी विद्यार्थी सज्ज

Amit Kulkarni

विजया क्रिकेट अकादमीने पटकाविला आनंद चषक

Amit Kulkarni

अनमोड चेक नाक्यावर गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

Patil_p

सोमवारी 69 नवे रुग्ण, महिलेसह दोघांचा मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!