तरुण भारत

शिरोडा येथील कल्याण आश्रम गोवा संचलित पंचशील इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

पंचवाडी, शिरोडा येथील कल्याण आश्रम गोवा संचलित पंचशील इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्कूलमधल्या एकूण ३९ विद्यार्थ्या मधील पाच विध्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. त्यात विशाल विट्टल घाडी ८३.६७%, रश्मीता बबलू बिश्वास ७७.६७%, चैतन्या प्रकाश वाडकर ७६.६७%, दत्ता प्रेमानंद गावकर ७५.१७ टक्के प्राप्त झाले आहे.

सदर विद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील विध्यार्थ्यांना पुर्ण वेळ स्कूल असते. येथे मुला व मुलीचे वेगळे वसतिगृह आहे. गोव्याच्या दुर्गम भागातून इच्छुक असलेले विद्यार्थी या स्कूलाचा व वसतिगृहचा लाभ घेतात. येथे विध्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्या सर्वांगीणी विकासावर भर दिला जातो. त्यामूळे येथे शिकणारे विध्यार्थीनी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी केलेली आहे.

Advertisements


यंदाच्या या सुयशा बद्दल कल्याण आश्रम गोवाचे अध्यक्ष डॉ. दिलीप केरकर, सचीव देवेंद्र गावकर, प्रांत संघटन मंत्री राजेश पडोळे, वसतिगृहाचे अध्यक्ष चंद्रकांत नायक, स्कूलचे चेरमन आनंद गावकर, मॅनेजर प्रकाश गावकर, मुख्याध्यापक निळकंट गावकर,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रदीप गावडे यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.

Related Stories

वे. प्रभाकरशास्त्री बाक्रे यांचे निधन

Amit Kulkarni

सोनसडा प्रकल्पाच्या शेडमधील कचरा पूर्णपणे हटविला

Omkar B

म्हादईसाठी 26 रोजी खांडेपार येथे कलश मिरवणूक

Patil_p

माडावर न चढता नारळ काढणे होणार सोपे

Omkar B

एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये एफसी गोवा चमकणार

Amit Kulkarni

कारागृह नव्हे, सुधारगृह…!

NIKHIL_N
error: Content is protected !!