तरुण भारत

तिरुपती बालाजीला सोन्याची तलवार अर्पण

6.5 किलो वजनाची सूर्य कटारी

आंध्रप्रदातील तिरुमला तिरुपति बालाजी मंदिर हे देशातील सर्वात धनाढय़ देवस्थानांपैकी एक आहे. या मंरात भगवान व्यंकटेश्वराला कोटय़वधी रुपये देणगीदाखल अर्पण केले जातात. सोमवारी हैदराबाद येथील श्रीनिवास दांपत्याने 1.8 कोटी रुपये खर्चून (सद्यकाळातील किंमत सुमारे 4 कोटी रुपये) सोन्याची तलवार अर्पण केली आहे.

Advertisements

दांपत्याने सोमवारी सकाळी तिरुमला तिरुपति देवस्थानमच्या पदाधिकाऱयांना सोन्याची तलवार सोपविली. हे दांपत्य मागील एक वर्षापासून तलवार अर्पण करू इच्छित होते. पण कोरोना संकटामुळे हे शक्य झाले नव्हते. ‘सूर्य कटारी’ ही तलवार मागील वर्षी देवासमोर ठेवू इच्छित होतो, पण कोरोनामुळे मंदिर बंद होते असे श्रीनिवास यानी म्हटले आहे.

सूर्य कटारी ही सोन्याची तलवार या दांपत्याने तामिळनाडूच्या कोइम्बतूर येथील तज्ञ ज्वेलर्सकडून तयार करवून घेतली आहे. या तलवारीच्या निर्मितीकरता सुमारे 6 महिन्यांचा कालावधी लागला आहे. साडेसहा किलो वजनी सोन्याची तलवार ही निर्मितीवेळी 1.8 कोटी रुपयांची होती. पण आता याची किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे.

Related Stories

केंद्र सरकारचा प्रस्ताव कृषी आंदोलकांनी फेटाळला

Omkar B

तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

Abhijeet Shinde

खासदार मोहनभाई डेलकर यांची आत्महत्या

datta jadhav

न्यायालयाच्या अवमानप्रकरणी तिघांना तीन महिन्यांचा कारावास

Patil_p

इतरांनी टाळलेली कामे करतोय संघ

Patil_p

चीनच्या ‘5-जी’ला जिओचा काटशह

Patil_p
error: Content is protected !!