तरुण भारत

बाजारपेठेत उडाली खरेदीसाठी झुंबड

लागोपाठ सण असल्याने लॉकडाऊन असतानाही खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

विकेंड लॉकडाऊननंतर येणाऱया सणांच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी सोमवारी बाजारपेठेत नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे शहरातील मोती चौक ते पाचशे एक पाटी, शनिवार चौक ते पोलीस करमणुक केंद्र, राधिका रोड, गोलबाग परिसर, राजपथ मार्ग, खणआळी आदी शहरातील मार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. ही गर्दी पाहता शहरात अनलॉक जाहीर करण्यात आला आहे, की काय असे वाटत होते.

 आजपासुन लागोपाठ सलग चार दिवस आषाढी एकादशी, बकरी ईद, बेंदुर व गुरू पौर्णिमा हे सण असल्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. अगदी सकाळी 9 पासुन ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही गर्दी पहावयास मिळाली. त्यातच दुपारी 12 नंतर पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने विक्रेत्यांबरोबर खरेदीदारांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. त्यामुळे रस्त्यावर गर्दी ही ओसंडून वाहत होती. तसेच काही ठिकाणी तर रस्त्याच्या मधेच ट्रकसारखे अवजड वाहन थांबवुन त्यातुन दुकानांचा किंवा गोडावुनचा माल उतविण्याचा प्रकार सुरू असल्याने ही इतर वाहने जाण्यास मार्गच नव्हता. या प्रकाराकडे मात्र वाहतुक विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसुन आले.

Related Stories

पक्षातील मित्र व सहकाऱ्यांनी आम्हाला सोडून जाऊ नये ; मिलिंद देवरांनी व्यक्त केली इच्छा

triratna

शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं – संजय राऊत

triratna

कोल्हापूर : शेंडा पार्क प्रयोगशाळा बांधकामाची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून पाहणी

triratna

कौटुंबिक वादातून युवकांचा आत्महतेचा प्रयत्न

Patil_p

महाराष्ट्राला पुन्हा दिलासा! मागील 24 तासात 29,177 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

राज्यपाल कोट्यातून प्रविण काकडे यांना विधान परिषदेवर घ्या

triratna
error: Content is protected !!