तरुण भारत

डिझोल्युशन सायन्स संशोधनात रत्नागिरीचा सुपुत्र देशात प्रथम

वार्ताहर/ पाली

देशपातळीवर आयोजित डिझोल्युशन सायन्स रिसर्च प्रेझेंटेशन इंडिया या स्पर्धेत रत्नागिरीचा सुपूत्र विक्रम चंद्रशेख जोशी याने प्रथम क्रमाक पटकावल़ा पंजाब मोहाली येथील सोसायटी फॉर फार्मासुटीकल डिझोल्युशन सायन्सयांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े एकूण देशभरातील 180 स्पर्धकांमधून सर्वोत्तम संशोधन म्हणून विक्रम जोशी यांच्या संशोधनाची निवड करण्यात आल़ी

Advertisements

 यावेळी विक्रम यांची यंग सायन्सटीस म्हणून सन्मानित करण्यात आले आह़े तसेच 50 हजार रूपये रोख व प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आल़े विक्रम हा रत्नागिरीमधील जोशी मेडीकलचे डॉ. चंद्रशेखर जोशी यांचे सुपूत्र आह़े विक्रम याच्या यशामुळे रत्नागिरीचे नाव देशपातळीवर झळकले आह़े विक्रमच्या या कामगिरीबद्दल रत्नागिरीतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 विक्रम याच्या घरची पार्श्वभूमी औषध क्षेत्राशी निगडीत असल्याने फार्मासुटीकल क्षेत्रात त्याने करीयरची निवड केल़ी एमफार्मा मध्ये शिक्षण घेत असताना डिझोल्युशनमध्ये त्याने ‘अंडरस्टँडींग द इनव्हावो बिहेविअर ऑफ सेलेकोव्हिक्स सोडीयम पॉलिमेरिक ऍमोरफॉस सॉल्ट सॉलीड डिस्पेरसीओन यु†िझंग बायोरिलेव्हेंट डिझॉल्युशन’ या विषयात संशोधन केले होत़े यामध्ये औषध निर्माण करणाऱया गोळ्यांची पावडर पोटामध्ये किती वेळात विरघळते, किती प्रमाणात विरघळते आदींवर संशोधन केल़े त्याचा वापर चांगल्या दर्जाची औषध निर्माण करण्यासाठी केला जात़ो या संशोधनाचे सादरीकरण देखील विक्रम याने तयार केले होत़े

   दरम्यान सोसायटी ऑफ फार्मासिटीकल ऍण्ड रिसर्च सेंटर मोहाली, पंजाब व डीआरपीआय हे अशा प्रकारच्या संशोधनांना प्रात्साहन देत असतात़ यासाठी डिझोल्युशन रिसर्च प्रझेंटेशन ऑफ इंडीया या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े यास्पर्धेत देशातील एकूण 180 संशोधकांनी सहभाग नोंदवला होत़ा त्यांच्या संशोधनाचे अवलोकन केल्यानंतर देशभरातील विविध तज्ञ पंचानी एकूण 124 संशोधने स्पर्धेसाठी निवडण्यात आल़ी त्यांना प्रझेंटेशन करण्याची संधी देण्यात आल़ी

    स्पर्धेत स्पर्धकांना संशोधनासंदर्भात विविध प्रश्न विचारण्यात आल़े यामध्ये संशोधनाचा उद्देश, गोल काय, उपयोगिता आदी माहिती पंचाकडून घेण्यात आल़ी यानंतर 124 स्पर्धकांमधून 21 जणांच्या संशोधनाची उपांत्य स्पर्धेसाठी निवड केली गेल़ी तर यातून 7 स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड केली गेल़ी यातून विक्रम जोशी यांनी केलेले संशोधन सर्वोत्तम ठरल़े यंग सायंटिस्ट ऍवॉर्ड 2021 म्हणून त्याचा गौरव करण्यात आल़ा  

Related Stories

नवीन मरिन इंजिनबाबत मच्छीमारांना प्रबोधन

NIKHIL_N

कोरोनावर चीनचा ‘त्रीसुत्री फॉर्म्युला’!

NIKHIL_N

‘हॅप्पी हाय फॉक्सिया’चा रत्नागिरीत शिरकाव

Patil_p

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘यंग ब्रिगेड’ला उद्यापासून लस

NIKHIL_N

जिल्हय़ात हलक्या पावसाची शक्यता

NIKHIL_N

५७ फुटाचा ब्लु व्हेल…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!