तरुण भारत

दिलासा : महाराष्ट्रात मागील 24 तासात 13,051 रुग्ण बरे!

  • राज्यात सक्रिय कोरोनारुग्ण लाखाच्या खाली 

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार दिसून येत आहेत. त्यातच कालच्या दिवशी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. दैनंदिन रुग्ण संख्येत आणि मृत्यू संख्येत लक्षणीय घट आहे. मागील 24 तासात 6 हजार 017 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 13 हजार 051 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 66 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Advertisements


राज्यात आजपर्यंत एकूण 59 लाख 93 हजार 401 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.


दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,56,48,898 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 20 हजार 207 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,61,796 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,052 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 96 हजार 375 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Related Stories

‘आयुष्यमान भारत’ चे ऑफिस सील, एकाला कोरोनाची लागण

prashant_c

‘या’ कर्मचाऱ्यांचा पूर्ण पीएफ भरणार सरकार

Patil_p

वैद्यकीय पंढरी मिरज शहरात कोरोनाचा पहिला बळी

Abhijeet Shinde

लस खरेदीवर जागतिक पातळीवर पडताळणी करा – आदित्य ठाकरे

Abhijeet Shinde

भारतातील नेजल वॅक्सिन मुलांसाठी ठरणार गेमचेंजर

datta jadhav

शिवथर येथे कोयत्याचा धाक दाखवून दरोडा

Patil_p
error: Content is protected !!