तरुण भारत

बांधकाम कामगारांना तातडीने रेशन किट द्या

संघटना पदाधिकाऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

बेळगाव : कामगारांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रेशन किटचे अद्याप वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे कामगारवर्ग अडचणीत आला असून तातडीने कामगारांना रेशन किट द्यावेत, अशी मागणी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisements

सर्वोच्च न्यायालयाने कामगारांना थेट रेशन किट द्यावेत, असा आदेश दिला आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून काही मोजक्मयाच आपल्या मर्जीतील कामगारांना हे रेशन किट दिले आहे. 2500 हून अधिक कामगार किट आले आहेत. ते सर्वांना तातडीने वितरित करावेत, अशी मागणी बांधकाम संघटनेच्यावतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. जी. ए. हिरेमठ, यशवंत लमाणी, शीतल बिलावर, संजू भोसले, आनंद वैद्य यांच्यासह कामगार उपस्थित होते.

Related Stories

शहरातील पोलिसांना बढती योग

Amit Kulkarni

लाल-पिवळा पेटविलेल्या संशयितांना जामीन

Amit Kulkarni

कारसह बेकायदा दारू जप्त

Patil_p

‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचे सादरीकरण

tarunbharat

किमान वेतन लागू करा

Omkar B

शनिवार-रविवारी असणार विकेंड लॉकडाऊन

Amit Kulkarni
error: Content is protected !!