तरुण भारत

ड्रेनेज तुंबल्याने विहिरींचे पाणी दूषित

कोरे गल्लीतील प्रकार, मनपाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कोरे गल्ली, शहापूर परिसरातील ड्रेनेज चेंबर तुंबण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. याबाबत तक्रारी नोंदवूनदेखील महापालिकेकडून कोणतीच उपाययोजना राबविण्यात येत नाही. परिणामी कोरे गल्ली परिसरातील विहिरींमध्ये सांडपाणी साचून पाणी दूषित बनले आहे. त्यामुळे या समस्येचे तातडीने निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शहरातील डेनेज समस्या निर्माण झाल्याने वारंवार तक्रारी होत आहेत. उपनगर परिसरात डेनेज समस्या निर्माण झाल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. डेनेज समस्यांचे निवारण करण्यासाठी मनपाकडे तक्रारी केल्या होत्या. पण मनपाचे अधिकारी लक्ष देत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डेनेज चेंबर तुंबल्याने शिवाजीनगर, नेहरूनगर, अयोध्यानगर, अनगोळ अशा उपनगरांतील नागरिकांच्या घरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहे. कोरे गल्ली परिसरातील डेनेज चेंबर तुंबल्याने मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता, केवळ आश्वासन मिळत आहे, पण कोणतीच कारवाई केली जात नाही. परिणामी सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने सांडपाणी पाझरून विहिरी व कूपनलिकांचे पाणी दूषित बनले आहे.

पाणीपुरवठा मंडळाकडून पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे विविध भागातील नागरिक विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा वापर करीत असतात. पण सदर पाणी दूषित बनल्याने दुहेरी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे डेनेज चेंबर तुंबल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे सांडपाणी विहिरींमध्ये मिसळून पाणी दूषित झाल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे डेनेज चेंबरची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

यंदे खुट मार्गावर कचऱयाची समस्या

Amit Kulkarni

माणुसकीने सोडली साथ… अन् प्रशासनाने दाखविला हात

Patil_p

कृष्णेवरील कुडची पूल तब्बल 13 दिवसांनी खुला

Amit Kulkarni

‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाला हरताळ!

Patil_p

आता क्वारंटाईनसाठी मंगल कार्यालयांचे बुकिंग

Patil_p

सीमाभाग केंद्रशासित करण्याची गरज

Rohan_P
error: Content is protected !!