तरुण भारत

मनपा सामान्य प्रशासन उपायुक्तांची बदली

प्रतिनिधी /बेळगाव

अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सरकारी कार्यालयांतील अधिकाऱयांच्या बदलीसत्राला प्रारंभ झाला आहे. महापालिका आयुक्तांची बदली झाल्याची चर्चा सुरू असतानाच मनपातील सामान्य प्रशासन उपायुक्त एस. पी. घंटी यांची बदली बेंगळूरला झाली आहे. यानिमित्त त्यांना महापालिकेच्यावतीने निरोप देण्यात आला.

Advertisements

सामान्य प्रशासन उपायुक्त एस. पी. घंटी हे वर्षभरापूर्वी मनपा कार्यालयात रुजू झाले होते. त्यांची बेंगळूर येथे बदली झाली आहे. यानिमित्त महापालिका आयुक्त चेंबरमध्ये छोटेखानी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुरेश देवण्णावर आणि आयुक्तांचे स्वीय साहाय्यक सुरेश कल्याणशेट्टी यांनी आपले विचार व्यक्त करून घंटी यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे व्यवस्थापक बी. एम. पिसाळे, जी. एन. भट्ट, आश्रय विभागाचे भरत तळवार व सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर भगदाड

Omkar B

32 मण सुवर्णसिंहासनासाठी निधी सुपूर्द

Amit Kulkarni

कर्मचाऱयांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

Amit Kulkarni

तिलारीनजीक धबधब्यामध्ये बुडून बेळगावच्या युवकाचा मृत्यू

Rohan_P

शनिवारी 29 नवे रुग्ण, 24 जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

बेळगावमधून दुबईला पोहचता येणार 7 तासांमध्ये

Patil_p
error: Content is protected !!