तरुण भारत

ट्रेंड खाकीचा

फॅशनविश्वात सतत नवे बदल होत असतात. नव्या रंगांचा समावेश होत असतो. सध्या खाकी रंगाचा चांगलाच बोलबाला असल्याचं पहायला मिळत आहे. खाकी पलाझो किंवा ट्राउजर्स लक्षवेधक ठरत आहेत.  गुडघ्यापर्यंतचा खाकी ड्रेस निळ्या डेनिमला पर्याय ठरत आहे. पावसाळ्यात खाकी रंगाची पादत्राणं भाव खाऊन जात आहेत. इतकंच नाही तर खाकी छत्र्या, रेनकोट्सचीही चलती आहे. बर्याच सेलेब्ज खाकी घालून मिरवताना दिसत आहेत. मेगन मार्कलने नुकताच खाकी बेल्टेड शर्ट ड्रेस घातला होता. यासोबतच खाकी शर्ट आणि मिडी स्कर्ट ही ट्रेंडमध्ये आहे. सोनाली बेंद्रेने खाकी रंगाचा कॉलरवाला शर्ट घातला होता. यात ती खूपच आकर्षक दिसत होती.

खाकी हा न्यूट्रल शेड असल्यामुळे कोणत्याही रंगासोबतच चालून जातो. वर्क लूकसाठी काळा, पांढरा, ग्रे, नेव्ही ब्लू, ऑलिव्ह, पिंक अशा रंगांसोबत खाकी कॅरी करता येईल. कॅज्युअल लूकसाठी आकाशी,एमरल्ड ग्रीन, डेनिम ब्लू, रूबी, लवेंडर, गुलाबी अशा पेस्टल शेड्ससोबत तुम्ही हा लूक कॅरी करू शकता.  खाकीसोबत ऑरेंज, कोरल, रेड, केशरी, येलो, पर्पल, सफायल ब्लू, फ्लोरोसंट ग्रीन असे रंगही ट्राय करता येतील. खाकी प्लॅटफॉर्म हिल पादत्राणांचीही सध्या बरीच चलती असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हीही खाकीची स्टाईल कॅरी करायला हरकत नाही.

Advertisements

Related Stories

पेस्टल रंगसंगतीची कमाल

Amit Kulkarni

क्रोशाचा मॉडर्न अवतार

tarunbharat

घरच्या घरी करा केस ‘स्ट्रेट’…

Omkar B

फॅशन लग्नातली

tarunbharat

अशी मिरवा फ्लोरल साडी

Amit Kulkarni

फॅशन बेल्टची

tarunbharat
error: Content is protected !!