तरुण भारत

Pegasus Spyware : नाना पटोलेंचाही फोन टॅप झाला होता, बाळासाहेब थोरातांचा गंभीर आरोप


मुंबई / ऑनलाईन टीम

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅप झाल्याचा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पेगासस स्पायवेअर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा दावा ‘द वायर’सह इतर काही मीडिया संस्थांनी केला. त्यानंतर आता त्याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटत आहेत. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारला धारेवर धरले. यावरच महाराष्ट्रातील नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा दावा थोरातांनी केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, नाना पटोले यांचेही फोन 2017-18 मध्ये टॅप झाले होते. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येतंय ते गंभीर आहे. कारण यामुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडेही जाऊ शकते,असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

12 आमदारांबाबत राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्यातील लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आहे. कारण महाराष्ट्रातील प्रश्न या 12 आमदारांमार्फत सभागृहात मांडले गेले असते, ते सोडवले गेले असते. याबाबत हायकोर्टापुढे विषय चालू आहे. पण कोर्टात जाण्याची वेळ येणं हेही दुर्दैव आहे. माननीय राज्यपालांना हा निर्णय लवकर देणे उचित राहील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मुंबई विमानतळाचा कारभार अहमदाबादला हलवण्याचा प्रकार सुरु आहे. याबाबत थोरात म्हणाले, 2014 नंतर मुंबईतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी गुजरातला कशा नेता येतील हा प्रयत्न सुरू आहे. असं केल्याने मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही. उद्योगांसाठी अजूनही महाराष्ट्राचं आकर्षण आहे. राज्यातील वातावरण, सुरक्षितता, यामुळे उद्योग आपल्याकडे येतात.

Related Stories

पुण्यातील वीजयंत्रणेला ‘निसर्ग’चा धक्का, जिल्हा अंधारात

datta jadhav

हनुमानसारखे पर्वत आणायला घराबाहेर पडू नका : अजित पवार 

prashant_c

मुंबईत केवळ एक दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक : महापौर किशोरी पेडणेकर

Rohan_P

छत्तीसगड : आठ टक्क्यांपेक्षा कमी संसर्ग दर असणाऱ्या जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये सूट

Rohan_P

आघाडीची पिछाडी

datta jadhav

पॅराबॅडमिंटनमध्ये भारताचा डबल धमाका, प्रमोद भगतची सुवर्णपदकाला गवसणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!