तरुण भारत

सांगली : मिरजेत नशेखोरांचा रिक्षा चालकावर हल्ला

प्रतिनिधी / मिरज

शहरातील रेल्वे जंक्शन आणि एसटी स्थानक परिसरात नशेखोर तरुणांचा हैदोस सुरूच आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास लियालत महंमदहुसेन शेख (वय 49, रा. सुभाषनगर) या रिक्षा चालकावर चाकु हल्ला करण्यात आला. दोघा नशेखोर तरुणांनी मारहाण करून रोख रक्कम काढून घेतली. याबाबत शेख यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Advertisements

गेल्या दोन आठवड्यांपासून रेल्वे आणि एसटी स्थानक परिसरात नशेखोर तरुणांच्या टोळक्यानी हैदोस घातला आहे. दोघा प्रवाशांच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. सदर सीसीटीव्हीत कैद झाली होती. मारहाणीतील एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. त्यानंतत इंडियन ऑइल टँकर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. तर दोनच दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनजवळील कपड्याचे दुकान फोडून चार लाखांची कपडे चोरून नेण्यात आली होती.

सोमवारी रात्रीही दोघा नशेखोर तरुणांनी पुन्हा हैदोस घातला. लियाकत शेख हे लघुशंकेसाठी थांबले असता त्यांची लूटमार करण्याचा हेतून चाकूने हल्ला करण्यात आला. त्यांच्या हाताला चाकू लागल्याने ते जखमी झाले. नशेखोरांनी मारहाण करून सहाशे रुपयांची रोख रक्कम काढून घेऊन पळ काढला. याबाबत शेख यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, दोघा नशेखोर तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

मिरज शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या

Abhijeet Shinde

सांगली : जत तालुक्यामधील सर्व सरपंच, उपसरपंच निवडी पुढे ढकलल्या

Abhijeet Shinde

कराडमध्ये आढळला शिवकालीन गध्देगाळ

Abhijeet Shinde

पाशवी बहुमताच्या जोरावर आता बळी गाडला जाणार नाही – शेट्टी

Abhijeet Shinde

उद्योगाला चालना देण्यासाठी पॅसेंजर गाडय़ा सुरू करा

Abhijeet Shinde

ऊसतोडणी मजूर, वाहतूकदार यांचा राज्यव्यापी संप : पडळकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!