तरुण भारत

कोरोनाच्या जनुकीय बदलाचे आव्हान

निवडक प्रकारच्या रुग्णांना अधिक लक्षपूर्वक व तज्ञांच्या सहाय्याने उपचार देऊन मृत्यू दर कमी करणे शक्य आह़े  त्यासाठी राज्यस्तरीय प्रशासकीय व लोकप्रतिनिधींचे म्हणावे तसे लक्ष असल्याचे दिसून येत नाह़ी

दरवर्षीप्रमाणे जुलै महिन्यात पावसाने कोकणपट्टीत जोर केला आह़े शेतकरी कामात व्यस्त असून भात व नागलीची लागवड पूर्ण करण्याकडे लक्ष आह़े अद्याप कोरोनाचे भय कमी झालेले नसून समाजात वावरताना काटेकोरपणे बंधनांचे पालन करावे लागत आह़े अजून काही काळ बंधने कायम राहतील, अशा सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहेत़ राज्यातील एकूण ऍक्टीव्ह रूग्ण संख्या लाखाच्या आसपास आह़े त्यातील 60 टक्के रूग्ण केवळ 10 जिह्यांमध्ये आहेत़ विशेष प्रभावाच्या जिह्यात अजूनही रत्नागिरी व सिंधुदुर्ग ही नावे असल्याने प्रशासनासह सामान्यांना मर्यादांची चौकट कायम ठेवावी लागत आह़े

Advertisements

सिंधुदुर्ग जिह्यात आतापर्यंत 46 हजार लोक बाधित झाल़े त्यापैकी 3 हजारच्या आसपास सक्रीय रूग्ण आहेत़ यापैकी सव्वा दोनशे रूग्णांची प्रकृती चिंतानजक आह़े त्यातील 181 जण ऑक्सिजनवर आहेत तर 43 रूग्णांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले आह़े रत्नागिरी जिह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 68,726 इतकी झाली आह़े जिह्यातील एकूण बरे झालेल्यांची संख्या आता 63,583 इतकी आह़े आतापर्यंत एकूण मृत्यू 1958 एवढे नोंदवले गेले आहेत़

कोरोना बाधितांची संख्या अद्याप अपेक्षेप्रमाणे कमी होत नसली तरी आरोग्य यंत्रणा त्यासाठी प्रयत्नशील आह़े सध्या यंत्रणेतील सर्वच घटक कमालीचे थकले असले तरी त्याबद्दल वाच्यता न करता काम सातत्याने सुरू ठेवण्यात आले आह़े लोकांकडून प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त होत आह़े सर्वाधिक वृष्टीचा जुलै महिना सध्या सुरू आह़े यामध्ये भरपूर पाऊस असल्याच्या कारणाने अनेक लोक घराबाहेर जाणे टाळतात़ कोरोनासाठी या मुद्याचा फायदा होईल, असे आरोग्य क्षेत्रातील लोकांना वाटत आह़े पुढचे काही दिवस जबरदस्त पर्जन्यमान राहण्याची शक्यता असून लोक केवळ जरूरीच्या कामासाठी बाहेर पडतील़ लोक संपर्क न आल्याने प्रसाराचा वेग कमी राहील, अशी शक्यता निर्माण झाली आह़े

कोरोनाची दुसरी लाट काही करता कोकणात कमी येत नव्हत़ी सततच्या प्रतिबंधांमुळे कावलेले लोक घराबाहेर पडून अनेक व्यवहार करण्यास व्यस्त राहिले होते. लोक संपर्काच्या कारणामुळे मोठय़ा प्रमाणात सुरू असलेला रोग प्रसार आटोक्यात येत नव्हत़ा पावसाच्या शक्यतेमुळे आता हे मान कमी होईल, असा अंदाज आह़े

कोरोना नियंत्रणात येण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या असल्या तरी आरोग्य खात्यातील लोक आणखी किमान 6 महिने हा रोग त्रास देत राहील, अशी शक्यता व्यक्त करत आहेत़ त्यामुळे लोकांना काही काळ दम काढणे आवश्यक आह़े रूग्णांच्या गृहविलगिकरणाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गरज निर्माण झाली असली तरी अद्याप त्यासाठीची काळजी घेतली जात नाह़ी ज्या घरात कोरोना रूग्ण आहेत़ त्या घरातील व्यक्ती कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडतात़ त्यांच्यामुळे रोगप्रसार होत आहे, असा आरोग्य विभागातील अधिकाऱयांचा दावा आह़े

कोरोना विषाणू आपले गुणधर्म सातत्याने बदलत असल्याच्या नेंदी जगभर होत आहेत़ बदललेल्या स्वरूपातील हा विषाणू वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत झाला आह़े काही ठिकाणी त्याचा अधिक वेगाने प्रसार झाल्याचे दिसून येत आह़े तर काही ठिकाणी असलेल्या औषधोपचारांना हा विषाणू सहजासहजी दाद देत नसल्याचे पुढे येत आह़े विषाणुच्या जनुकीय रचनेबद्दल परदेशात सातत्याने संशोधन होत असलेतरी भारतात मात्र मर्यादित स्वरूपात संशोधन होत आह़े

कोकणात विषाणुमध्ये जनुकीय बदल झाल्याचे निश्चितपणे आढळून आल़े घेतलेल्या अगदीच थोडक्या नमुन्यांमध्ये बदललेला विषाणू दिसून आल़ा तथापि बदललेल्या विषाणूचा प्रसार गावोगावी केवढय़ा प्रमाणात झाला असावा याचा अंदाज काही बांधता येत नाह़ी कोकणातील कोरोना सहजासहजी आटोक्यात न येण्यामागे जनुकीय बदल हे मोठे कारण असू शकत़े वातावरणीय बदलांसह अनेक गोष्टी जनुकीय बदलासाठी कारणीभूत ठरत आहेत़ स्टीरॉईडसह अनेक प्रकारचे औषधोपचार किंवा लसीकरणासारखे प्रतिबंधाचे मुद्दे देखील विषाणूच्या जनुकीय बदलासाठी कारणीभूत ठरत आहेत़ एकूणच काय कोकणातील संगमेश्वरसह अन्य ठिकाणी बाधित रूग्णांकडून घेतलेल्या नमुन्यात जनुकीय बदल झालेला आढळून आला आह़े त्याला तोंड देण्यासाठी व्यापक कार्य योजना झाल्याचे मात्र †िदसून आले नाह़ी चाचण्या वाढवा व कोरोना प्रतिबंधांचे पालन कऱा एवढय़ाच ठोकळेबाज बाबी राबवल्या गेल्य़ा ज्याप्रमाणे जनुकीय बदलामुळे विषाणू आपले आव्हान उभे करत आहे त्याप्रमाणे सामाजिक आरोग्य विभागाने देखील आपल्या रणनितीत बदल केला पाहिज़े काळाच्या ओघात जैविक मुद्यांवर वेगवेगळे बदल दिसून येत असताना त्याला रोखण्यासाठी नव्या आधुनिक प्रकारच्या विचाराने नियंत्रण केले पाहिज़े

मृत्यू दराच्या बाबतीत देखील चिंता करावी, अशी कोकणात परिस्थिती आह़े देशाचा किंवा राज्याच्या मृत्यूदरापेक्षा अधिक मृत्यूदर येत्या कोणत्या रूग्णांना कोरोना अधिक जोखीम ठरू शकतो हे वर्षभराच्या अनुभवाने हे आरोग्य यंत्रणा शिकली आह़े निवडक प्रकारच्या रूग्णांना अधिक लक्षपूर्वक व तज्ञांच्या सहाय्याने उपचार देऊन मृत्यू दर कमी करणे शक्य आह़े त्यासाठी राज्यस्तरीय प्रशासकीय व लोकप्रतिनिधींचे म्हणावे तसे लक्ष असल्याचे दिसून येत नाह़ी

रत्नागिरी जिह्यात हजारो रूग्ण सध्या उपचाराखाली आहेत़ यापैकी काहीजणांची प्रकृती चिंताजनक आह़े असे असताना यंत्रणेकडे आरोग्य खात्याने नियुक्त केलेला फिजिशियन उपलब्ध नाह़ी खासगी मानद वैद्यकांवर अवलंबून राहण्याची वेळ यंत्रणेवर आली आह़े एक वैद्यक किती रूग्णांना तपासू शकतो त्याला मर्यादा आहेत़ अशावेळी दूर ठिकाणी असलेल्या फिजिशियनची सेवा टेडिमेडीसीन व्यवस्थेद्वारे उपलब्ध करणे शक्य आह़े अद्याप तसा विचार आरोग्य यंत्रणेने केलेला नाह़ी नजीकच्या टप्प्यात तसा झाल्यास मृत्यूदरात सुधारणा होईल़

सुकांत चक्रदेव

Related Stories

परिवर्तनाचा खंदा सेनानी- बाळासाहेब जाधव

Omkar B

देहाभिमान आणि ज्ञानाभीमान

Patil_p

एका बीजापोटी तरु कोटी कोटी

Patil_p

हनुमंताचा ‘एअर स्ट्राईक’

Patil_p

सत्तांतराचे वारे

Patil_p

अल्झायमर समजून घेताना…

Patil_p
error: Content is protected !!