तरुण भारत

एशियन पेन्ट्सचा नफा तेजीत

जून तिमाहीत 161 टक्क्यांनी मजबूत कामगिरीची नोंद – लॉकडाऊनचा परिणाम

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

देशातील रंग उत्पादक कंपनी एशियन पेन्ट्सने मंगळवारी जून तिमाहीची आकडेवारी सादर केली आहे. कंपनीला एप्रिल ते जून दरम्यान 570 कोटी रुपयांनी एकत्रित नफा झाला आहे. वर्षभराअगोदर जून तिमाहीत कंपनीला 218 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 5580 कोटी रुपयांवर राहिले असून हाच आकडा वर्षा अगोदर 2925 कोटी रुपये होता.

महसूलात वाढ

कंपनीचा पेन्ट व्यवसायाचा महसूल हा जवळपास 90.4 टक्क्यांनी वाढून 5,464.7 कोटींवर राहिल्याची माहिती आहे. वर्षाच्या अगोदर समान तिमाहीत 2,870.6 वर महसूल राहिला होता.

लॉकडाऊनचा प्रभाव

देशातील डेकोरेटीव्ह व्यवसायाने दुप्पट वाढ नोंदवली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी घर रंगवून घेतल्याचे दिसून आले. त्यामुळेच रंगांची मागणी याकाळात वाढलेली दिसली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत याखेपेस समाधानकारक महसूल राहिल्याचे एशियन पेन्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सिंघल यांनी म्हटले आहे.

Related Stories

कोरोनावर ‘फेविपिरावीर’ औषधाला परवानगी

Patil_p

पंजाबच्या राजकारणात नवे समीकरण

Patil_p

अलका लांबांशी असभ्य वर्तन, ‘आप’ च्या कार्यकर्त्यावर उगारला हात

prashant_c

प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

Rohan_P

”इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी ही चूक होती, पण…”

Abhijeet Shinde

बिहारमध्ये 16 ते 22 जून दरम्यान कोरोना निर्बंधात सूट; सायं. 6 पर्यंत सुरू रहाणार दुकाने

Rohan_P
error: Content is protected !!