तरुण भारत

साताऱयात तीन जुगार अड्डा चालकांना दणका

प्रतिनिधी/सातारा

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांत तीन प्रमुख ठिकाणच्या जुगार अड्डय़ांवर पोलिसांनी छापा टाकून जुगारअड्डा चालकांना दणका दिला आहे. या कारवाईत सतराजणांवर गुन्हा दाखल झाला असून या कारवाईत 41 हजारांची रोकड आणि सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यापैकी सर्वात मोठी कारवाई राजधानी टावर्स परिसरात झाली आहे.

Advertisements

सातारा शहरातील राजधानी टॉवर्समधील पार्किंगच्या शेजारी असणाऱया जिन्याच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्डय़ावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी मटका व्यवसायिक नरेश जांभळे याच्यासह तेराजणांवर गुन्हा दाखल केला असून या कारवाईत 34 हजार 219 रुपयांची रोकड आणि पाच मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले. ज्या तेराजणांवर गुन्हा दाखल केला आहे ते स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लोकांच्याकडून आकडय़ावर पैज म्हणून पैसे स्वीकारुन टाईम बाजार मटका, कल्याण मटका व राजधानी डे मटका नावाचा जुगार चालवत होते, असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, पोलिसांनी सतीश महादेव शेडगे (वय 49, रा. 23, गडकर आळी, सातारा), पापा गेणू गवळी (वय 36, रा. प्रतापसिंहनगर, खेड, सातारा), तेजस मधूकर देशमुख (वय 30, रा. बॉम्बे रेस्टॉरंट, पुष्कर हॉलच्या पाठीमागे), तसेच मटका व्यवसायिक नरेश धर्मराज जांभळे (वय 44, रा. ढोणे कॉलनी, मंगळवार पेठ, सातारा) सुभाष बाळू गिरी (वय 51, रा. व्यंकटपूरा पेठ, सातारा), शंकर दादासाहेब चव्हाण (वय 49, रा. 522, मंगळवार पेठ, सातारा), श्रीकांत सखाराम संकपाळ (वय 59, रा. शनिवार पेठ, सातारा), रमेश कालिदास धुमाळ (वय 58, रा. मंगळवार पेठ, सातारा), दिनकर कोंडिबा वारागडे (वय 54, रा. पावर हाऊस झोपडपट्टी, बोगदा, मंगळवार पेठ,), संतकुमार सुखलाल पासवान (वय 26, रा. सोमवार पेठ,), राहूल सतीश जमदाडे (वय 36, रा. 87, सोमवार पेठ), निलेश बबन सकटे (वय 30, रा. शहापूर, ता. सातारा), बाळू कोंडिबा ढेबे (वय 49, रा. चिपळूणकर बागेजवळ, मंगळवार पेठ) हे सर्वजण स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लोकांच्याकडून आकडय़ावर पैज म्हणून पैसे स्वीकारुन टाईम बाजार मटका, कल्याण मटका व राजधानी डे मटका नावाचा जुगार चालवत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याबरोबरच मटका व्यवसायिक नरेश जांभळे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, शाहूपूरी पोलिसांनी काशी विश्वेश्वर मंदीर परिसर आणि सोन्याची गिरणीजवळ जुगार अड्डय़ावर छापा टाकला आहे. या कारवाईत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवार पेठेतील राजस चौकाजवळील सोन्याच्या गिरणीजवळ जुगार अड्डय़ावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून 6 हजार 494 रुपयांची रोकड, एक मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विशाल यशवंत पिलावरे (रा. जंगीवाडा, मंगळवार पेठ), जुगारअड्डा मालक मालक देवेंद्र ढोणे (रा. मंगळवार पेठ, सातारा) या दोघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना सीआरपीसी अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक स्वप्नील कुंभार यांनी दिली आहे.

साताऱयातील काशीविश्वेश्वर मंदीर परिसरात सुरु असलेल्या जुगार अडड्डय़ावर शाहूपुरी पोलिसांनी धाड टाकून निलेश गुलाबराव शिंदे (653, मंगळवार पेठ, सातारा), यासीन शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) या दोघांवर कारवाई केली आहे.  या कारवाईत 510 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याबाबत तक्रार पोलीस कॉन्स्टेबल ओकांर यादव यांनी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

वीरजवान संदीप सावंत अनंतात विलीन

Abhijeet Shinde

तरूणांनो सेल्फी ठरतीये धोकादायक

Patil_p

“वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,” चित्रा वाघ यांचं ट्वीट

Abhijeet Shinde

महाराष्ट्रातील मंदिरं पुन्हा बंद होणार ? केंद्रीय मंत्र्यांचा इशारा

Sumit Tambekar

जिल्ह्यात बाधित वाढ शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न

datta jadhav

शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे सुरू करण्याचा ठाकरे सरकारचा मानस

datta jadhav
error: Content is protected !!