तरुण भारत

कवी परेश कामत यांना डॉ. टी. एम. ए. पै पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी /फोंडा

 नामवंत गोमंतकीय कवी परेश नरेंद्र कामत यांच्या ‘रंगबोली’ या कोकणी कविता संग्रहाला मणिपाल फाऊंडेशनचा प्रतिष्ठेचा डॉ. टी. एम. ए. पै उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार 2019 जाहीर करण्यात आला आहे.

Advertisements

मानपत्र व रोख रु. 25,000 असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मणिपाल येथे होणाऱया एका खास कार्यक्रमात परेश कामत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आतापर्यंत त्यांचे अळंग, गर्भखोल, शुभंकर, चित्रलिपी व रंगबोली असे पाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या चित्रलिपी या कवितासंग्रहाला 2018 सालचा केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी गोवा सरकारचा युवा सृजन पुरस्कार, मुंबईच्या गोवा हिंदू असोसिएशनचा पद्मश्री बा. भ. बोरकर स्मृती पुरस्कार, कला अकादमी साहित्य पुरस्कार, जनगंगा साहित्य पुरस्कार, गोवा कोकणी अकादमी सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कविता मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, पंजाबी, उडीया, कन्नड अशा अनेक भाषांत अनुवादित झालेल्या आहे. मेघालय, बंगळुरु, केरळ, नागालँड, कोनार्क, औरंगाबाद, हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कवी संमेलनात ते सहभागी झाले आहेत. त्यांच्या कविता बी. ए. व एम. ए च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

Related Stories

अन्यथा आज दिगंबर कामत भाजपमध्ये असते-दामू नाईक

Omkar B

फुटबॉलच्या विकासासाठी क्लबांनी अकादमींची निर्मिती करावीः प्रसून बॅनर्जी

Amit Kulkarni

निवडणुकीपूर्वी पक्षाची पुनर्बांधनी करणार

Omkar B

लोकांना सहकारी संस्थांचे योग्य सहकार्य मिळणे आवश्यक

Patil_p

तापाची साथ, कोरोना नव्हे!

Amit Kulkarni

निरंकाल येथील वानरमाऱयांना जीवनावश्यक वस्तूचे वितरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!