तरुण भारत

कोरोनाचे संकट अजूनही कायम

मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आवश्यक : दिवसभरात 132 नवे बाधित, 2 बळी, 157 कोरोनामुक्त

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

कोरोनाबाधित आणि बळी यांच्यात चढ उतार पहायला मिळत असून कोरोनाचे संकट अजूनही कायम असल्याचे संकेत त्यातून स्पष्ट होत आहेत. गेल्या 24 तासात म्हणजे मंगळवारी कोरोनाचे 2 बळी गेले असून 132 नवीन बाधित सापडले आहेत. त्यामुळे लोकांनीही अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मास्क वापरुन आणि सामाजिक अंतर पाळून आपले रोजचे दैनंदिन व्यवहार करावे, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

सोमवारी कोरोनाबाधित 100 च्या खाली होते तर मंगळवारी ते 100 हून अधिक झाले. मध्यंतरी दोन दिवस कोरोना बळी नव्हते, परंतु पुन्हा बळी होऊ लागल्याने कोरोनाचे संकट कायम असल्याचे संकेत मिळत आहेत.

मंगळवारी दिवसभरात 157 जण बरे झाले तर 14 जणांना हॉस्पिटलात भरती करण्यात येऊन 19 जणांना हॉस्पिटलातून घरी पाठवण्यात आले. सध्या 1409 सक्रिय कोरोना रुग्ण असून 118 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. गेल्या वर्षांपासून आतापर्यंत मिळून 1,69,971 जणांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातील 1,65,449 कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोना बळींचा आकडा दिवसभरातील 2 बळीमुळे वाढला असून तो 3113 वर पोहोचला आहे.

Related Stories

लोकशाही प्रधान सरकार स्थापनेसाठी जनतेने मदत करावी- मायकल लोबो

Amit Kulkarni

जनतेची ज्याला पसंती त्यालाच भाजपची उमेदवारी – रवी

Patil_p

शेतकऱयांचे फॉर्म भरण्यासाठी पोस्टमन शेतकऱयांच्या दारात

Patil_p

धावत्या ट्रकला आग लागून ट्रक खाक

Amit Kulkarni

कालिका संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र वेर्लेकर यांना मातृशोक

Amit Kulkarni

ओल्ड गोव्यातील बांधकामावर कायदेशीर मार्गाने कारवाई -मुख्यमंत्री

Patil_p
error: Content is protected !!