तरुण भारत

कोविड नियमांचे पालन करत बकरी-ईद साजरी करण्याचे आवाहन

बेळगाव : मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स ठेऊन बकरी-ईद साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे. कोविडच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होता कामा नये. तेव्हा प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि सण साजरा करावा, असे त्यांनी कळविले आहे. प्रार्थनास्थळांमध्ये जाताना मास्कचा वापर करावा. 65 वर्षांवरील व्यक्ती व दहा वर्षांपेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांनी घरातच नमाज अदा करावी. त्यांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी होणाऱया कार्यक्रमामध्ये भाग घेऊ नये, असे स्पष्ट केले आहे. प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करताना प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करावे, नमाजनंतर हात मिळवणी अथवा आलिंगन देऊ नये, असेही पत्रकात म्हटले आहे.

Related Stories

सरकारी ग्रंथालयांची वेळ वाढवा

Amit Kulkarni

बाजारपेठेत विविधरंगी-बहुढंगी राख्या दाखल

Amit Kulkarni

महिला आघाडीतर्फे बी. आय. पाटील यांना श्रद्धांजली

Omkar B

बागलकोट येथे 13 पासून प्रवेश परीक्षा

Omkar B

एसकेई, विजया क्रिकेट अकादमी संघ विजयी

Amit Kulkarni

कोल्डचेन ब्रेक झाल्यामुळेच ‘त्या’ मुलांचा मृत्यू

Amit Kulkarni
error: Content is protected !!