तरुण भारत

‘नोरो’ विषाणूने वाढवली धास्ती

ऑनलाईन टीम / लंडन : 

कोरोना संपत नाही तोच ब्रिटनमध्ये ‘नोरो’ विषाणूची एन्ट्री झाली आहे. या विषाणूने कोरोनाप्रमाणेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ब्रिटनसह जगाची चिंता वाढली आहे. 

Advertisements

ब्रिटनमध्ये आतापर्यंत नोरो विषाणूचे 154 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेथील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) म्हटले आहे की, कोरोना विषाणूपेक्षा नोरो विषाणू जास्त धोकादायक आहे आणि यामुळे संसर्ग वेगाने पसरतो. 

अतिसार, उलट्या, चक्कर येणे आणि ओटीपोटात तीव्र वेदना होणे ही या विषाणूची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय बर्‍याच रुग्णांमध्ये ताप, डोकेदुखीची लक्षणे दिसतात. या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर 12 ते 48 तासांच्या आत हा संसर्ग पसरतो. नोरो विषाणूला पोटाचा फ्लू असेही म्हटले जाते.

Related Stories

डेल्टापेक्षाही धोकादायक ‘लॅम्बडा’ व्हेरियंट

Patil_p

आधुनिक उपग्रहाची इराणला रशियाकडून भेट!

Patil_p

लसीच्या थीमवर होते पेस्ट्रींची निर्मिती

Patil_p

नीरव मोदीच्या कोठडीत 6 ऑगस्टपर्यंत वाढ

datta jadhav

दक्षिण कोरियाचे पाऊल

Patil_p

अमेरिकेत महामारीचा कहर

Patil_p
error: Content is protected !!