तरुण भारत

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चौघांवर गुन्हा

बंदी आदेशाचा भंग करून बानूरगड येथे बहिर्जी नाईक स्मारकाचे भूमिपूजन

प्रतिनिधी / विटा

Advertisements

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग करून खानापूर तालुक्यातील बानूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम घेतल्या प्रकरणी भाजपचे राज्य प्रवक्ते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चार जणांवर विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नायब तहसिलदार चेतन रमेश कोनकर यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सोमवारी 19 जुलै रोजी सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान खानापूर तालुक्यातील बानूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा परिसर विकास व पर्यटन पायाभुत विकास कामाचे भुमिपुजन कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने केले होते. सदर कार्यक्रमाला बानूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे ठिकाणी अंदाजे 150 ते 170 लोक उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम जिल्हाधिकारी सांगली यांचे बंदी आदेशाचे उल्लंघन करुन घेतल्याचे नायब तहसिलदार चेतन रमेश कोनकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

यावरून बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर, निलेश नेताजी पाटील (रा. खंबाळे (भा)),भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा आमदार गोपीचंद पडळकर आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर (दोघे रा. पडळकरवाडी, ता. आटपाडी) अशा चौघांवर विटा पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जे. ए. जाधव करीत आहेत.

Related Stories

सांगलीत सात पॉझिटिव्ह, धाकधूक वाढली

triratna

म्हसवडच्या कोविड सेंटरला सोयीसुविधा पुरवणार

Patil_p

कोल्हापूर : दूध दरवाढीसाठी भाजपने महामार्ग रोखला

triratna

एक दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा बाजार कोसळला

Patil_p

लोकसहभागातून सांगलीवाडी घाटाची स्वच्छता

triratna

जिथे ताकद तिथे शर्थीने लढा; मदत करू

triratna
error: Content is protected !!