तरुण भारत

CBSC BORD : बारावीच्या निकालाबाबत शाळांना दिला नवा आदेश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


सीबीएसईने बुधवारी सर्व शाळांसाठी एक नवा आदेश जारी केला आहे. देशातील सीबीएसई शाळांतील बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, अजूनही सीबीएसईकडून नेमका निकाल कोणत्या दिवशी लागणार याबाबत घोषणा न केल्याने मुलांमध्ये बैचेनी वाढली आहे. 

Advertisements


शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीचा निकालासंबंधी उरलेली कामं पूर्ण करण्यासाठी 22 जुलै हे तारीख दिली होती. मात्र आता ही तारीख वाढवून 25 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजतापर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


CBSEशी संबंधित सर्व शाळा दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्यात व्यस्त आहेत. इयत्ता 12 वीचा निकालासंबंधी सर्व कामं पूर्ण करण्याची अंतिम तारीख 22 जुलै आहे. सर्व प्रादेशिक कार्यालययं, परीक्षा विभाग आणि बोर्ड मुख्यालय शेवटच्या तारखेपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी आणि शाळांना मदत करण्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत काम करतील अशी माहिती CBSE बोर्डाकडून देण्यात आली आहे.


CBSE ला ईमेल व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शाळांकडून काही प्रश्न आणि विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात प्रश्न आणि उत्तरं तयार केली जात आहेत आणि अशी अपेक्षा आहे की या सर्व शाळांना दुपारी 12 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येईल जेणेकरुन शाळा योग्य ती कारवाई करू शकतील असंही CBSE बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.


याआधी CBSE बोर्डानं शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणांसंबंधी सर्व माहिती पोर्टलवर अपडेट करण्यातही काही कालावधी दिला होता. मात्र काही शाळांना यंत्र अडचणी आल्यामुळे हे तारीख आता वाढवून देण्यात आली आहे त्यामुळे बारावीचा CBSE चा निकाल काही काळ उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. 

Related Stories

27 जुलैपासून नियमित सुनावणी

Patil_p

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळ्याचे फडणवीसांना आमंत्रण नाही ; भाजप नेते नाराज

triratna

दिल्ली कॅपिटल्स-सीएसके आज आमनेसामने

Omkar B

बदलापूरच्या एका कंपनीत रासायनिक गॅसगळती; अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास

pradnya p

शाहीन बागमागे पीएफआय : ईडी

Patil_p

तामिळनाडू राज्यातही 31 ऑगस्टपर्यंत टाळेबंदी

Patil_p
error: Content is protected !!