तरुण भारत

इल्मी अन् प्रेम शुक्ला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते

भाजप अध्यक्षांकडून शिक्कामोर्तब

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

भाजप जनता पक्षाकडून बुधवारी दोन नव्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. आम आदमी पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या शाजिया इल्मी अणि मुंबईतील प्रेम शुक्ल यांची भाजपने नवे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांच्याकडून प्रसिद्ध पत्रकानुसार भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी प्रेम शुक्ल आणि शाजिया इल्मी यांच्या प्रवक्तेपदी नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.

राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्यावर शाजिया यांनी पक्षाच्या नेतृत्वाचे आभार मानले आहेत. अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी देण्यासाठी आभारी असल्याचे इल्मी यांनी म्हटले आहे.

शाजिया यापूर्वी टीव्ही पत्रकार राहिल्या आहेत. त्यांनी पत्रकारिता सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. इल्मी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक देखील लढविली होती. पण त्यांना पराभूत व्हावे लागले होते. 2014 मध्येच त्यांनी आम आदमी पक्षाला रामराम ठोकला होता. तर 2015 पासून त्या भाजपमध्ये कार्यरत आहेत.

Related Stories

वेळीच उपचार घेतल्यास ‘ब्लॅक फंगस’मधून सुटका

Patil_p

राजस्थान काँगेसमध्ये गटबाजी सुरूच

Patil_p

वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान वाटा

Patil_p

हिमाचल प्रदेश : खाजगी शाळांमध्ये केवळ ‘ट्युशन फी’ घेण्याचे आदेश

pradnya p

भारत-अमेरिका युद्धाभ्यासात कोरोनाची एंट्री

Patil_p

आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलूही कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!