तरुण भारत

अफगाण सैन्यप्रमुख पुढील आठवडय़ात भारतात

अजित डोवाल देणार तालिबानला हरविण्याचा मंत्र

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

अफगाणिस्तानात तालिबानची दहशत वाढतच चालली आहे. देशाच्या मोठय़ा भूभागावर तालिबानचा कब्जा झाला आहे. महत्त्वाच्या सीमा चौक्या देखील तालिबानच्या कब्जामध्ये आहेत. एकप्रकारे तालिबानने अफगाणिस्तान सरकारला आर्थिक दृष्टय़ा हतबल केले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवडय़ात अफगाण सैन्यप्रमुख जनरल वली मोहम्मद अहमदजई भारतात येत आहेत. अहमदजई हे भारतीय सैन्यप्रमुख मनोज नरवणे आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भेटणार आहेत. या भेटींमध्ये तालिबानला सामोरे जाण्यासंबंधीच्या व्यूहनीतिवर चर्चा होणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तानच्या सर्वोच्च संरक्षण अधिकाऱयांची भेट तालिबानच्या वाढत्या प्रभावादरम्यान अत्यंत महत्त्वाची आहे. पाकिस्तान तालिबानला मदत करत असल्याने ही भेट विशेष महत्त्वपूर्ण आहे. अफगाण सैन्य अनेक जिल्हय़ांवर नियंत्रण पुन्हा मिळविण्यासाठी झगडत असताना ही भेट होत आहे. अमेरिका पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत स्वतःचे सैन्य हटविण्याच्या तयारीत आहेत. नाटो देखील सैन्य हटवत आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱया चर्चेत दोन्ही देशांदरम्यान सैन्य सहकार्य वाढविण्यावर चर्चा होईल.

अफगाणिस्तान सैन्याला प्रशिक्षित करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे. पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीत सुमारे 300 अफगाणी कॅडेट्सचे प्रशिक्षण सुरू आहे. जनरल वली तेथील दौरा करून काही कॅडेट्सना भेटू शकतात. जखमी अफगाण सैनिकांवर भारतातील अनेक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

तालिबानविरोधात व्यूहनीति

भारताने मागील काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानात 3 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. चार एमआय24 हेलिकॉप्टर्स आणि तीन चीता हेलिकॉप्टर्सही अफगाण सैन्याला उपलब्ध केली आहेत. तर डोवाल यांच्याकडे पाकिस्तानात काम करण्याचा मोठा अनुभव असून ते तालिबानची कार्यपद्धतही चांगल्याप्रकारे ओळखून आहेत. जनरल वली यांना ते तालिबानला सामोरे जाण्यासाठी महत्त्वाच्या सूचना करू शकतात. जानेवारीमध्ये डोवाल यांनी अफगाणिस्तानचा दौरा करत तेथे दहशतवादविरोधी लढाईचा मुद्दा मांडला होता. अफगाणिस्तानात दहशतवाद्यांचे वाढते प्रस्थ भारताच्या सुरक्षेसाठी धोक्याचे आहे.

मागील महिन्यात स्वीकारले पद

जनरल यासीन जिया यांना हटवून अध्यक्ष गनी यांनी मागील महिन्यात जनरल वली यांना सैन्यप्रमुख केले होते. जनरल वली भारताला मिलिट्री हार्डवेअरचा पुरवठा करण्यास सांगू शकतात. अफगाणिस्तान आणि तालिबान यांचे संबंध बिघडत असताना हा दौरा होणार आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात अफगाण राजदूताच्या मुलीचे अपहरण झाल्याने संबंधांमधील कटूता अधिकच वाढली आहे.

Related Stories

आनंदाची बातमी; ‘टीईटी’ प्रमाणपत्र वैधता आयुष्यभरासाठी वाढवली

triratna

कोरोनाची धास्ती : चंदीगडमध्ये पुन्हा एकदा विकेंड कर्फ्यू जारी!

Rohan_P

राजस्थानचे सत्तानाटय़ थेट राजभवनात

Patil_p

विजापूरमधील जवान काश्मीरमध्ये हुतात्मा

Patil_p

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाचा सखोल तपास व्हावा

Patil_p

हरियाणात शेतकऱ्यांचे ‘टोल फ्री’ आंदोलन

datta jadhav
error: Content is protected !!