तरुण भारत

जम्मू-काश्मीर – नियमांमध्ये मोठा बदल

स्थानिक महिलेशी विवाह करणारा होणार मूळ रहिवासी

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisements

जम्मू-काश्मीरमध्ये मूळ रहिवाशावरून लागू असलेल्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. केंद्रशासित प्रदेशाच्या महिलेसोबत विवाह करणाऱया अन्य राज्यांचे पुरुष देखील तेथील मूळ रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) प्राप्त करू शकतील. सामान्य प्रशासन विभागाकडून यासंबंधी अधिसूचना काढण्यात आली आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीर बाहेर विवाह करणाऱया महिलांचे पती राज्यात रहिवासी प्रमाणपत्र प्राप्त करू शकत नव्हते.

कलम 370 आणि 35 अ हद्दपार करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. नव्या अधिसूचनेनंतर अन्य राज्यांमध्ये विवाह करणाऱया महिलांचे पती आणि त्यांच्या मुलांनाही केंद्रशासित प्रदेशाचे रहिवासी होता येणार आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या पुरुषाने अन्य कुठल्याही राज्यातील महिलेशी विवाह केल्यास संबंधित महिला आणि तिच्या मुलांना मात्र रहिवाशाचा दर्जा मिळत होता. सरकारने हा निर्णय लैंगिक असमानता संपविण्यासाठी घेतला आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हद्दपार केले होते.

31 डिसेंबर 2020 पर्यंत जम्मू-काश्मीर सरकारकडून 32 लाख डोमिसाइल सर्टिफिकेट प्रदान करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्च महिन्यात दिली होती. जम्मू-काश्मीर प्रशासनानुसार डोमिसाइल सर्टिफिकेटसाठी 31 डिसेंबरपर्यंत 35 लगख्ग 44 हजार 938 अर्ज प्राप्त झाले होते. यातील 32 लाख 31 हजार 353 अर्जदारांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने राज्यसभेत म्हटले होते.

Related Stories

जम्मू काश्मीर : भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र रैना यांना कोरोनाची बाधा

pradnya p

भारताने 24 औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले

prashant_c

‘यास’च्या थैमानात लाखो लोक बेघर

Patil_p

सायना नेहवालने केला भाजपमध्ये प्रवेश

prashant_c

लवकरच मिळणार आणखी पाच राफेल

Patil_p

ज्येष्ठ नेते महाबळ मिश्रा काँग्रेसमधून निलंबित

Patil_p
error: Content is protected !!