तरुण भारत

एअर कारनंतर आता उडणारी बाईक

काही दिवसांपूर्वी उडणाऱया कारचे यशस्वी परीक्षण झाले होते. याचे नाव एअर कार असून आकाशात उड्डाण केल्यावर ही कार एका कॉकपिटमध्ये रुपांतरित झाली हाती. या कारने एका विमानतळापासून दुसऱया विमानतळापर्यंत 35 मिनिटांपर्यंत उड्डाण केले होते. पण केवळ कारच नव्हे तर आता एक उडणारी कार देखील चर्चेत आली आहे.

या उडणाऱया बाइकचे नाव पी वन असून स्पीडर या नावाने देखील तिचा प्रचार केला जात आहे. या एअर बाइकच्या मदतीने व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंगही केले जाऊ शकते. या बाइकला हवेत 15 हजार फुटांच्या उंचीपर्यंत नेले जाऊ शकते, तर एकर कारला 8200 फुटांच्या उंचीपर्यंतच नेता येते असा कंपनीचा दावा आहे.

Advertisements

जेटपॅक एव्हिएशननुसार स्पीडरचे दोन व्हेरियंट्स सादर केले जाणार आहेत. एकाचा वापर सर्वसामान्यांना करता येणार आहे. दुसऱया व्हेरियंटला सैन्य किंवा मदत-बचाव कार्याशी संबंधित मोहिमेत वापरता येणार आहे. ही बाइक पूर्णपणे स्टेबलाइज असेल यामुळे यात किमान वैमानिकाचे प्रशिक्षण आवश्यक असल्याचे कंपनीने स्वतःच्या वेबसाइटवर नमूद केले आहे.

या बाईकचा कमाल वेग 241 किलोमीटर प्रतितासापर्यंत जाऊ शकतो असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. मिलिट्री एअरबाइक तीस मिनिटांपर्यंत हवेत राहू शकते, तर याचबरोबर या एअर बाइकचा दुसरा व्हेरियंट 10 ते 20 मिनिटांपर्यंत हवेत राहू शकतो.

या बाइकला सध्या जेट इंधन, डिझेल आणि केरोसिनने चालविले जाऊ शवपे. पण कंपनी आता पर्यावरणाला कमीत कमी नुकसान होईल अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे. जेटपॅक एव्हिएशनला टिम ड्रेपर यांचे समर्थन प्राप्त आहे. हिम यांनी यापूर्वी एलन मस्क यांची कंपनी टेस्ला अणि स्पेसएक्समध्ये गुंतवणूक केली होती. कंपनी आतापासूनच पी2 नावाच्या नव्या मॉडेलवरही काम करत आहे.

ही बाइक जेट टर्बाइनने देखील धावणार असून यात दोन जण बसू शकतात. कंपनीने या प्रोटोटाइपचे यशस्वी परीक्षण कॅलिफोर्नियात केले आहे. जेटपॅक एव्हिएशनचे सीईओ डेव्हि मेमॅन यांच्यानुसार या बाइकची किंमत 3 लाख 80 हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास 2 कोटी 83 लाखांच्या आसपास असू शकते.

Related Stories

पाकिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वाराचे मशिदीत रूपांतर करण्याचा प्रयत्न

datta jadhav

भोजन निवडीत मानसिक अवस्थेची भूमिका

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 75 लाखांचा टप्पा

datta jadhav

निवडणूकपूर्व सर्वेक्षणात ज्यो बिडेन आघाडीवर

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 7 लाखांचा टप्पा

datta jadhav

आपत्तीनंतरही 4 वर्षीय आयदा सुखरुप

Patil_p
error: Content is protected !!