तरुण भारत

केवळ मास्कद्वारे तयार केला वेडिंग ड्रेस

कोरोना महामारीत फेस मास्कचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. संक्रमणावर नियंत्रण मिळविलेल्या देशांमध्ये फेस मास्कपासून मुक्तता मिळत आहे. इंग्लंडमध्ये फेस मास्कची अनिवार्यता संपल्याने तेथील एका डिझाइनरने या फेस मास्कचा वापर करत एक वेडिंग ड्रेस तयार केला आहे.

इंग्लंडमध्ये सुमारे दोन वर्षांनी निर्बंध हटल्याने लोक आनंदी आहेत. देशात आता विवाहावरील बंधनेही हटली असल्याने वेडिंग प्लॅनर विशेष उत्साही झाले आहेत. यानिमित्त वधूचा एक अत्यंत सुंदर ड्रेस सादर करण्यात आला, जो फेकण्यात आलेल्या 1500 मास्कपासून तयार करण्यात आला आहे.

Advertisements

या ड्रेसला मॉडेल जेमिमा हॅम्ब्रोने परिधान करत लंडनमध्ये सेंट पॉल कॅथेड्रलनजीक फोटोशूट करविले आहे. वेडिंग प्लॅनर वेबसाइट हिच्डने या ड्रेससाठी निधी पुरविला आहे. वेबसाइटच्या एडिटर सराह एलार्ड यांनी विवाहांचा हंगाम आता परतत असल्याचे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

या ड्रेसमध्ये कंबरेजवळ हाइलाइट देण्यासाठी डिस्पोजेबल प्लास्टिक पीपीईचा वापर करण्यात आला आहे. या पूर्ण ड्रेसला तयार करण्यासाठी पांढऱया मास्कचा वापर झाला आहे. अत्यंत सुंदर दिसणारा हा वेडिंग ड्रेस चर्चेत आला आहे.

Related Stories

50 लाखांहून अधिक बाधित

Patil_p

नेल्सन मंडेला यांच्या कन्या झिंदझी यांचे निधन

datta jadhav

वधू निघाली चक्क बहिण

Patil_p

चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या 84 हजार नव्हे तर 6 लाख 40 हजार

datta jadhav

जगातील सर्वात महागडी कार

Patil_p

रशियाने तयार केले कोरोनावर प्रभावी औषध

datta jadhav
error: Content is protected !!