तरुण भारत

इन्स्टाग्रामवर रश्मिका ठरली लोकप्रिय

दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्रींना टाकले मागे

दक्षिणेत स्वतःचे सौंदर्य आणि उत्तम अभिनयाच्या बळावर लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तयार आहे. तिची देशभरात आणि सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे. रश्मिकाने आता काजल अग्रवाल, सामंथा अक्किनेनी आणि विजय देवरकोंडाला इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सप्रकरणी मागे टाकले आहे.

Advertisements

काजलचे या ऍपवर 19 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर सामंथाचे 17.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. विजयचे 12.5 दशलक्ष चाहते आहेत. तर रश्मिकाचे इन्स्टाग्रामवर 19.4 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत.

रश्मिका ‘मिशन मजनू’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणरा आहे. यात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. हा चित्रपट भारतातील सर्वात साहसी मोहीम आणि सत्यघटनांवर आधारित आहे. याचबरोबर ‘गुडबाय’ चित्रपटात ती अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत दिसून येणार आहे.

कियाराकडून शेरशाहचे पोस्टर प्रसारित

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या शेरशाह या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. अभिनेत्री कियाराने इन्स्टाग्रमावर चित्रपटाचे नवे पोस्टर प्रसारित कॅप्टनचे शौय आणि साहसाचे स्मरण केले आहे. ‘त्यांनी स्वतःच्या बलिदानाने शौर्याला एक अर्थ दिला’ असे कियाराने फोटोसह नमूद पेल आहे. शेरशाह हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धात पॉइंट 4875 प्राप्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्वतःचे अदम्य साहस आणि युद्धकौशल्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने गौरविण्यात आले होते. कॅप्टन विक्रम बत्रा 7 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धादरम्यान हुतात्मा झाले होते. अभिनेत्री कियारा चित्रपटात हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा यांची वाग्दत्त वधू डिंपल चीमा यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णूवर्धन यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती करण जौहर यांची कंपनी धर्मा प्रॉडक्शन करत आहे.

Related Stories

सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोना; सारासह घरातील सदस्यांनी केली टेस्ट

Rohan_P

केजीएफ 2 प्रदर्शनावेळी राष्ट्रीय सुटी द्या!

Patil_p

केट विंसलेटच्या अभिनयाची कमाल

Patil_p

उर्वशी रौतेला परतली सेटवर

Patil_p

‘द लास्ट हुर्रे’मध्ये दिसणार काजोल

Patil_p

‘सिर्फ एक फ्राइडे’त दिसणार अवितेश

Patil_p
error: Content is protected !!