तरुण भारत

एचसीएलकडून 20 हजार जणांची भरती

2021 अखेरपर्यंत होणार नोकर भरती – वेगाने प्रगती करणारी कंपनी- आयटी क्षेत्रात रोजगारात वाढ

बेंगळूर –

Advertisements

 कोरोना काळात अनेक व्यवसाय बंद होते. पण आयटी कंपन्यांचे काम मात्र सुरूच आहे. आयटी फर्म एचसीएल
टेक्नॉलॉजीसकडून येणाऱया काळात 20 हजार जणांची भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती साधणारी ही कंपनी आहे. यावषी कंपनी नव्याने उमेदवारांना संधी देऊ करणार आहे. याअंतर्गत 20 ते 22 हजार जणांना भरतीत सामील करून घेतले जाणार आहे. 1 जुलैपासून ठरावीक हुशार कर्मचाऱयांच्या वेतनात वाढही करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जून 2021 च्या तिमाहीअखेर नोयडात मुख्य कार्यालय असणाऱया या कंपनीत एकूण कर्मचाऱयांची संख्या 1 लाख 76 हजार 499 वर पोहोचली आहे. याच दरम्यान नव्याने
दाखल झालेल्या कर्मचाऱयांची संख्या 7 हजार 522 वर पोहोचली आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीसचे मनुष्यबळ विकास अधिकारी (सीएचआरओ) आप्पाराव व्ही. व्ही. यांनी सांगितले, की 2020 मध्ये कंपनीने 14 हजार 600 जणांना जागतिक स्तरावर सामावून घेतले आहे. यावषी 20 ते 22 हजार उमेदवारांना भरती करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात प्रेशर्सची संख्या 6 हजार इतकी असू शकते, असेही ते म्हणाले. जून 2021 ला कंपनीने 9 टक्के वाढीसह 3214 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता.

Related Stories

टीसीएसचे सीईओ गोपिनाथन यांना 20 कोटीचे वेतन प्राप्त

Patil_p

मार्च तिमाहीत जागतिक व्यापारात घट

Patil_p

शेअर बाजारात ‘मुहूर्ता’वर दिवाळी

Patil_p

रिलायन्ससोबतचा एअरटेलचा करार पूर्ण

Patil_p

टाटा पॉवरला मिळाले 488 कोटींचे कंत्राट

Patil_p

जुलैमध्ये रत्ने-आभूषणांची निर्यात 38 टक्क्यांनी घटली

Patil_p
error: Content is protected !!