तरुण भारत

आता उत्तराखंड सीमेवरही चिनी सैन्याच्या हालचाली

मानवरहित विमानांचा वावर – ‘एलएसी’वर कुरापतींचे सत्र

लडाख / वृत्तसंस्था

Advertisements

लडाखमधील वातावरण अद्याप थंड झालेले नसताना आता चिनी सैन्याने उत्तराखंड भागातील सीमावर्ती भागामध्ये हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. तिढा सोडविण्यासाठी लष्करी पातळीवर चर्चेच्या फेऱया सुरू असतानाच चीनच्या कुरापतींचे सत्र मात्र थांबलेले दिसत नाही. चीन वारंवार भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारताची बारीक नजर असून चीनच्या या नव्या कुरापतींमुळे संरक्षण दल अलर्टवर आहे.

उत्तराखंडमधील बाराहोटी सेक्टरमध्ये चीनने आपले सैन्य पेट्रोलिंगसाठी पाठवले आहे. चीनचे 35 सैनिक पेट्रोलिंग करत असल्याची माहिती मिळाली आहे. एकीकडे लडाख सीमेवर आपली ताकद वाढवत असतानाच उत्तराखंड सीमेवर बाराहोटी जवळ चीनची मानवरहित विमाने दिसली होती. त्यानंतर आता चीनचे सैनिकही दिसल्यामुळे भारतीय संरक्षण दल सतर्क झाले आहे.

चीन वारंवार भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी सुरू असलेल्या लडाख सीमेवरील चीनच्या हालचालीही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता लडाखपासून अगदी जवळ तिसरा लष्करी हवाईतळ उभारण्याचे काम चीनने हाती घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकचे परिसरात चीनचा नवा एअरबेस तयार केला जात आहे. काशगर आणि होगान इथे आधीपासूनच चीनचे हवाईतळ असून या दोहोंमधील अंतर 400 किलोमीटर इतके आहे. आता या दोन्ही तळांच्या मधोमध तिसरा एअरबेस उभारून चीन लॉजिस्टिकची अडचण संपवत असल्याचीही चर्चा आहे.

Related Stories

कोरोना विषाणूबाबत धोक्याचा इशारा देणाऱया डॉक्टरचा मृत्यू

prashant_c

जर्मनीत गोवंशासाठी ‘रिटायरमेंट होम’

Patil_p

सहा महिन्यांचा नीचांक

Omkar B

गृहयुद्धाच्या जखमा विसरतोय सीरिया

Patil_p

पाकला मदत करण्यास फ्रान्सचा नकार

datta jadhav

जगभरात 20 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!