तरुण भारत

पंजाब काँगेसमधील संघर्ष कायम

नवज्योत सिद्धू यांचे शक्तीप्रदर्शन, सुवर्ण मंदिराला भेट- कॅप्टन अमरिंदरसिंग नाराज

अमृतसर / वृत्तसंस्था

Advertisements

काँगेस श्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्षपद देऊन पाठींबा व्यक्त केल्याने नवज्योतसिंग सिद्धू यांचा आत्मविश्वास बळावल्याचे दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी त्यांनी सर्व आमदारांना अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात बोलाविले होते. काँगेसच्या 77 आमदारांपैकी 62 आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या सर्व आमदारांना घेऊन सिद्धू यांनी सुवर्ण मंदिरासह दुर्गियाना मंदिर आणि रामतीर्थ स्थान येथेही जाऊन दर्शन घेतले. हा कार्यक्रम धार्मिक स्वरुपाचा असला तरी प्रत्यक्षात ते सिद्धू यांचे राजकीय शक्तीप्रदर्शनच होते, असे जाणकारांचे मत आहे. मात्र या शक्तीप्रदर्शनामुळे पंजाब काँगेसमधील अंतर्गत संघर्ष अधिकच वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी या शक्तिप्रदर्शनामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा शक्तिप्रदर्शनाचा विपरीत परिणाम पक्षाच्या ऐक्यावर होईल, अशी प्रतिक्रिया त्यांच्या गटाने व्यक्त केली.

अहंकार सोडा

सिद्धू यांनी अमरिंदर सिंग गटाला अहंकार सोडण्याचे आवाहन केले. त्यामुळे हा गट अधिकच संतप्त झाला. सिद्धू यांनी क्षमायग्नाचना करावी, अशी मागणी या गटाने केली. संख्याबळाच्या खेळात सिद्धू यांनी आघाडी घेतल्याचे सध्या जरी दिसत असले तरी सिद्धूंबरोबर असलेल्या आमदारांमध्ये अनेक जण अमरिंदरसिंग यांचे समर्थक आहेत. ते ऐनवेळी बाजी उलटवितील अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

Related Stories

रशियाच्या लसीसंबंधी शास्त्रज्ञांना शंका

Patil_p

हिजबुलच्या चार दहशतवाद्यांना ठार मारले

Patil_p

LAC वर लाऊडस्पीकर लावून चीन वाजवतोय पंजाबी गाणी

datta jadhav

मागण्या पूर्ण न झाल्यास इच्छामरणाची अनुमती द्या!

Patil_p

दहशतवाद्यांशी लढणाऱ्या सहा जवानांना शौर्य चक्र

prashant_c

कोरोनापासून वाचण्यासाठी आदिवासींचा उपाय

Patil_p
error: Content is protected !!