तरुण भारत

2032 ऑलिम्पिकचे ब्रिस्बेन यजमान

32 वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला पसंती

टोकियो / वृत्तसंस्था

Advertisements

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात 2032 मधील ऑलिम्पिक आयोजित केले जाईल, यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. 2000 सिडनी ऑलिम्पिक व 1956 मेलबर्न ऑलिम्पिकनंतर ऑस्ट्रेलियाने ऑलिम्पिक भरवण्याची ही तिसरी वेळ असेल. ब्रिस्बेनने 72-5 मताधिक्याने ऑलिम्पिक यजमानपद मिळवले.

‘आम्ही ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा ऑलिम्पिकचे यशस्वी यजमानपद भूषवू’, असा विश्वास पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्यक्त केला. ब्रिस्बेनला यजमानपद जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयातून 11 मिनिटांचा व्हीडिओ जारी केला. ब्रिस्बेनमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत यजमानपद मिळाल्याचा आनंद व्यक्त केला गेला. 2032 ची ऑलिम्पिक ब्रिस्बेनमध्ये होईल, याचे संकेत काही महिन्यांपूर्वी आयओसीच्या बैठकीत मिळाले होते. शुक्रवारी टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा रंगणार असून त्यापूर्वी 2032 ऑलिम्पिक यजमानपदाची घोषणा केली गेली. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 2018 राष्ट्रकुल स्पर्धा संपन्न झाली झाली होती. ब्रिस्बेनमधील गब्बा क्रिकेट स्टेडियमचे नूतनीकरण केले जाणार असून तेथे ऑलिम्पिकचे काही सामने होतील, असे संकेत आहेत

Related Stories

मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाचा ‘ऑफिसर ईन ऑर्डर’

Patil_p

पी. व्ही. सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओला नमवत जिंकले कांस्य पदक

triratna

ब्राझीलच्या क्रिव्हेलारोच्या मुक्कामात वाढ

Patil_p

बजरंग-संगीताने घेतले सात नव्हे, आठ फेरे!

Patil_p

विराट कोहलीने वाचवला कोरोनाग्रस्त क्रिकेटपटूच्या आईचा जीव; केली 6.77 लाखांची मदत

Rohan_P

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड ऑगस्टमध्ये

Patil_p
error: Content is protected !!