तरुण भारत

अमन, सागर कॅडेट गटातील नवे वर्ल्ड चॅम्पियन

वृत्तसंस्था/ बुडापेस्ट

भारताचे युवा मल्ल अमन गुलिया व सागर जगलान हे आपापल्या वयोगटातील नवे वर्ल्ड चॅम्पियन बनले आहेत. येथे सुरू असलेल्या कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱया दिवशी भारताने शानदार प्रदर्शन केले.

Advertisements

48 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत गुलियाने अमेरिकेच्या ल्युक जोसेफ लिलेडालवर 5-2 अशा गुणांनी मात करीत जेतेपद पटकावले. सागरने 80 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत जेम्स मॉकलर रॉलीचा 4-0 असा धुव्वा उडविला. याशिवाय 110 किलो वजन गटात भारताच्या साहिलने कझाकच्या अलिखान कुसैनोव्हला पहिल्या दोन मिनिटातच चितपट करून कांस्यपदक मिळविले. तसेच जसकरण सिंगने उपांत्य फेरीत अझरबैजानच्या अब्दुलरहमान इब्राहिमोव्हवर 6-2 अशी मात करीत किमान रौप्यपदक निश्चित केले. सुवर्णपदकासाठी त्याची लढत उझ्बेकच्या कमरॉनबेक कादामोव्हशी होणार आहे. अन्य सामन्यात वैभव पाटीलला 55 किलो वजन गटात कांस्यपदकाच्या प्लेऑफ लढतीत अझरबैजानच्या जाविद जवाडोव्हकडून 5-7 अशी हार पत्करावी लागली. चिराग (51 किलो) व जयदीप (71) यांच्या कांस्यपदकासाठी लढती होणार आहेत.

Related Stories

अंकिता रैनाची विजयी सलामी

Patil_p

एचएस प्रणॉयचा रोमांचक विजय

Patil_p

कुस्ती माझा ध्यास अन् कुस्ती हाच श्वास : कुस्ती समालोचक शंकर पुजारी

Shankar_P

विराट सेनेचा दणदणीत विजय; ऑस्ट्रेलिया ऑल आऊट !

triratna

कोणी टाकला आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू?

Patil_p

मिश्र सांघिक स्कीटमध्ये भारताला सुवर्ण

Patil_p
error: Content is protected !!