तरुण भारत

इंग्लंडचा पाकवर मालिकाविजय

वृत्तसंस्था/ मँचेस्टर

येथे झालेल्या तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात यजमान इंग्लंडने पाकिस्तानवर 3 गडय़ांनी रोमांचक विजय मिळवित तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. आदिल रशिदने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना 35 धावांत 4 बळी मिळविले.

Advertisements

पाकने प्रथम फलंदाजी करीत मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकामुळे 20 षटकांत 6 बाद 154 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 19.4 षटकांत 7 बाद 155 धावा जमवित सामन्यासह मालिकाही जिंकली. पाकच्या डावात रिझवानने 57 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 76, फख्र झमानने 24, हसन अलीने 9 चेंडूत 15, शोएब मकसूदने 13, बाबर आझमने 11 धावा फटकावल्या. रशिदशिवाय मोईन अलीने पाकचा एक गडी बाद केला. इंग्लंडतर्फे जेसॉन रॉयने 36 चेंडूत 12 चौकार, 1 षटकारासह 64 धावा फटकावल्या तर बटलरने 21, डेविड मलानने 31, मॉर्गनने 12 चेंडूत 21 धावा फटकावल्या. पाकच्या मोहम्मद हाफीझने 28 धावांत 3 तर शदाब खान, उस्मान कादिर, हसन अली, इमाद वासिम यांनी एकेक बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक ः पाक 20 षटकांत 6 बाद 154 (रिझवान नाबाद 76, झमान 24, रशिद 4-35, मोईन 1-19), इंग्लंड 19.4 षटकांत 7 बाद 155 (रॉय 64, मलान 31, बटलर व मॉर्गन प्रत्येकी 21, हाफीझ 3-28, शदाब खान 1-22).

Related Stories

पॅट कमिन्सचे प्रमुख लक्ष चेतेश्वर पुजारा

Patil_p

पाकचा दक्षिण अफ्रिकेवर मालिका विजय

Patil_p

शदमन इस्लाम दुसऱया कसोटीतून बाहेर

Patil_p

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; हार्दिक पांड्याचे पुनरागमन

tarunbharat

स्टुटगार्ट स्पर्धेतून स्वायटेकची माघार

Patil_p

राष्ट्रीय शिबिरात मनिका बात्राचा सहभाग नाही

Patil_p
error: Content is protected !!