तरुण भारत

जिल्हय़ात संततधार पावसाने जनजीवन ठप्प

प्रतिनिधी/  सातारा

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केली असून पश्चिम भागात जोर वाढला असून धरण परिसरात पावसाची संततधार सुरु  आहे. तर पूर्व भागात पावसाची प्रतिक्षा असून महाबळेश्वरमध्ये 82 मिलीमीटर पावसाची नेंद झाली आहे तर कोयना धरणात 57.7 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. सातारा शहरातही दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. दरम्यान, वाई तालुक्यातील कोंढवळे येथील कातकरी वस्तीतील एकाच्या अंगावर छप्पर पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Advertisements

गेल्या दोन दिवसांपासून जिह्याच्या पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये सातारा शहर व तालुक्यात बुधवारी दिवसभर काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु होती. कास परिसरात पावसाची रिमझिम सुरु होती. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पश्चिम भागातील जावली, वाई, महाबळेश्वर, कराड, पाटण या तालुक्यात पावसाने आगमन केले आहे. तर पूर्व भागात पावसाची प्रतिक्षा आहे. सातारा शहरात नागरिकांनी पुन्हा छत्र्या बाहेर काढल्या होत्या. तालुक्यात शेतीच्या कामांना वेग आला होता.

जिह्याच्या पश्चिम भागात जावली, वाई, महाबळेश्वर, पाचगणी येथे आज सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पाटण तालुक्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.  आज सकाळपासूनच ठोसेघर आणि कास पठार परिसरात सोसाटय़ाचा वारा आणि जोरदार पाऊस पडत होता. या परिसराला दिवसभर पावसाने झोडपून काढल्यामुळे हा पाऊस हात पिकांसाठी अत्यंत हितकारक मानला जात आहे.

जिह्यात सरासरी 19.8 मि.मी. पाऊस

जिह्यात काल दिवसभरापासून आज मंगळवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 19.8 मि. मी. पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 119.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 23.3 (91.7) मि. मी., जावळी 47 (154.8) मि. मी., पाटण 35.0 (157.5) मि. मी., कराड 14.0 (75.0) मि. मी., कोरेगाव 9.7 (84.7) मि. मी., खटाव 7.8 (46.0) मि. मी., माण 3.6 (118.3) मि. मी., फलटण 0.7 (65.4) मि. मी., खंडाळा- 2.7 (45.0) मि. मी., वाई 18.3 (120.4) मि. मी., महाबळेश्वर 85.6 (636.3) मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, दरम्यान गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे 148 (1547) मिलीमीटर, नवजा 204 (2180) तर महाबळेश्वर येथे 238 (2181) इतक्या पावसाची नोंद झाली असून धरणाची पाणीपातळी 2116 फूट 11 इंच झाली आहे.

Related Stories

पुण्यात आता मास्कपासून ‘मर्यादित’ सुटका

pradnya p

शिराळा तालुक्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून

Shankar_P

भाजपतर्फे मोफत घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती शिबीर

triratna

कोव्हिड रुग्णालयांवर आता सीसीटीव्ही आधारे नियंत्रण

triratna

सध्या देशात दोनच राज्यात राज्यपाल आहेत : संजय राऊतांचा टोला

pradnya p

जि.प. सीईओंची तडकाफडकी बदली

Patil_p
error: Content is protected !!