तरुण भारत

जिल्हय़ात आज बेंदराचा उत्साह

पावसाच्या आगमनाने शेतकरी खुश

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

शेती, शेतकरी आणि बैल यांना कृषी संस्कृती मोठे स्थान असते. शेतीकामांमध्ये शेतकऱयांना मदत करणारा बैल हा शेतकऱयांसाठी खऱया अर्थाने कुटुंबाचा एक घटकच असतो. त्यामुळेच पेरणीची कामे पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी बेंदूर मोठय़ा उत्साहात साजरा होत असतो. यावर्षी देखील खरीपाला पावसाचा चांगला दिलासा लाभला असून त्यामुळे यावर्षीचा बेंदूर सण देखील उत्साहाने साजरा करण्यासाठी बळीराजाने जय्यत तयारी केली आहे.  

  भारतीय संस्कृतीत येणारे सणउत्सवही मोठय़ा प्रमाणावर शेतीशी संबंधीतच आढळतात. बेंदूर सण हा सुद्धा अशाच संस्कृतीचा भाग आहे. बेंदूर सणातून कृषी संस्कृती पाहायला मिळते. शेतकरी, शेतकऱयाचे पशूधन, त्याच्यासोबत शेतात राबणारे बैल हे एकमेव दुवा पाहायला मिळतो. महाराष्ट्रात यंदा बेंदूर सण 22 जुलै या दिवशी साजरा होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे अर्थातच देशातील सण उत्सवांवर बंधने आली आहेत. मात्र, बेंदूर हा सण त्याला अपवाद ठरु शकतो. कारण हा सण कृषीप्रधान असल्यामुळे शेतकरी हा सण आपल्या शेतात साजरा करु शकतात. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन न करता हा सण साजरा करता येऊ शकतो.

 जिल्हय़ात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगाम बहरला असून त्यातच आलेला बेंदूर साजरा करण्यासाठी शेतकऱयांनी जय्यत तयारी केली आहे. आपल्या सर्जा-राजाला सजवण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याबरोबरच त्याची मिरवणूक काढून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हय़ातील ग्रामीण भागात उत्साही वातावरण आहे. गुरुवारी बेंदूर साजरा करुन बैलांना पुरण-पोळीचा घास भरवण्यासाठी जय्यत तयारी झाली आहे.

Related Stories

सॅमसंगला मिळाले वेरिझॉनकडून कंत्राट

Patil_p

शिरोळ पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद – जिल्हा पोलीस प्रमुख

Shankar_P

इपीएफओत ऑगस्टमध्ये 10.50 लाख नवी खाती

Omkar B

आसाम-बंगालमध्ये चहा उद्योगावर कोरोनाची छाया?

Patil_p

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवावर गुन्हा दाखल

Shankar_P

कर्नाटक: कोरोना मृत्युदर एक टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्टः मंत्री सुधाकर

Shankar_P
error: Content is protected !!