तरुण भारत

कोकण मार्गावर रेल्वेगाडय़ा धावताहेत तीन तास विलंबाने

प्रतिनिधी/ खेड

गोवा-करमाळी येथील बोगद्यात दरड कोसळल्याने कोकण मार्गासह कर्नाटक-केरळमध्ये जाणारी ठप्प झालेली वाहतूक 18 तासानंतर पूर्ववत झाली असली तरी तिसऱया दिवशीही रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले होते. कोकण मार्गावरुन धावणारी राजधानी एक्स्प्रेस बुधवारीही अडीच तास तर मत्स्यगंधा एक्स्प्रेस 3 तास विलंबाने धावली. उशिराने धावणाऱया रेल्वेगाडय़ांमुळे सलग तिसऱया दिवशीही प्रवाशांची रखडपट्टी झाली.

Advertisements

  मुंबई रुळावर पाणी साचल्याने कोकण मार्गावरुन धावणाऱया 7 रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. त्यातच दक्षिण रेल्वे मार्गावरील पादिल-कुलासेखारा येथे रेल्वे ट्रकवर कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱयांमुळे कोकण मार्गावरुन धावणाऱया रेल्वेगाडय़ा 5 ते 6 तास उशिराने धावत होत्या. त्यात गोवा-करमाळी बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची भर पडल्याने विस्कळीत वेळापत्रक अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. बुधवारी दिल्लीच्या दिशेने जाणारी राजधानी एक्सप्रेस तब्बल अडीच तास व मत्स्यगंधा एक्स्प्रेसही 3 तास विलंबाने धावली. मंगळवारी नेत्रावती एक्स्प्रेसची फेरी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले होते.

आणखी 1-2 दिवसांनी वेळापत्रक सुरळीत

बुधवारपासून नेत्रावती एक्स्प्रेस कोकण मार्गावर पुन्हा धावू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. रेल्वेगाडय़ांचे बिघडलेले वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न सुरु असून यासाठी आणखी एक-दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Stories

रत्नागिरी : हातपाटी वाळूबाबत लवकरच धोरण ठरवणार!

triratna

पाणी योजनेचा कोटय़वधीचा खर्च ‘पाण्यात’!

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात 73 नवे कोरोना पॉझिटिव्ह तर पाच बळी

Shankar_P

मुद्रांक शुल्कातील कपातीमुळे व्यवहारात तेजी

Omkar B

जैतापूर सागरी महामार्गावरील खड्डे श्रमदानाने बुजविले

Patil_p

रत्नागिरीत येथे होणार तात्पुरते कारागृह

triratna
error: Content is protected !!