तरुण भारत

महाराष्ट्रात मागील 24 तासात 8,159 नवे कोरोनाग्रस्त; 165 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली आहे. यासोबतच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. मागील 24 तासात राज्यात 8 हजार 159 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 7 हजार 839 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 165 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Advertisements


राज्यात आजपर्यंत एकूण 60 लाख 08 हजार 750 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के एवढा आहे.


दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,60,68,435 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,37,755 (13.54%) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,51,521 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,795 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 94 हजार 745 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • मुंबई : सध्या 6,020 रुग्णांवर उपचार सुरू 


मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 435 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 560 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कालच्या दिवशी 13 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,32,349 वर पोहचली असून त्यातील 7,08,214 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 15,739 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पतीचा काळ 1097 दिवस इतका आहे. 

Related Stories

महाराष्ट्रातील लॉकडाऊन सरसकट उठवणार नाही, शिथिलता देण्यात येणार – राजेश टोपे

triratna

राष्ट्रीय आपत्तीत शिक्षक झाले पोलीस

Patil_p

बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

pradnya p

सोलापुरात गुरूवारी नव्याने 81 कोरोनाबाधित रुग्णांची भर

triratna

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊ नये : माजीद मेमन

pradnya p

स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार कोविड प्रतिबंधक लस

pradnya p
error: Content is protected !!