तरुण भारत

दिगंबर कामत, चर्चिल यांच्या विरोधात आज आरोप निश्चिती

गाजलेले जयका-लुईस बर्जर लांचखोरी प्रकरण

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

जयका आणि लुई बर्जर प्रकरणातील संशयित आरोपी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व माजी साबांखामंत्री चर्चिल आलेमाव यांच्या विरुद्ध आज 22 जुलै 2021 रोजी आरोप निश्चित केला जाणार आहे.

एन्फोर्समेन्ट डिपार्टमेन्टने सदर तक्रार नोंदवून बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला होता. सुमारे 1 कोटी 95 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. आरोप निश्चितीनंतर सदर जप्त झालेली मालमत्ता सरकार जमा करण्याचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या लुईस बर्जरला निविदा

गोव्यात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी जपान सरकारने आर्थिक मदत देण्याचे ठरवले होते. जपानच्या जायका नामक महामंडळाला जबाबदारी दिली होती. या प्रस्तावाचा अभ्यास करून प्रकल्प अहवाल सादर करण्यास आंतरराष्ट्रीय निविदा जारी झाली तेव्हा अमेरिकेच्या लुईस बर्जर आस्थापनाला निविदा मिळाली.

मंत्री, अधिकाऱयांना 75 कोटींची लांच

या लुईस बर्जर अस्थापनाने प्रकल्प अहवाल सादर करण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी सुमारे 75 कोटी गोव्यातील मंत्री आणि अधिकाऱयांना लाच दिली होती, हे अमेरिकेतील न्यायालयात उघड झाले व लुईस बर्जर कंपनीच्या अधिकाऱयांना दोषी ठरवून शिक्षाही झाली.

गोवा सरकारने सदर प्रकरणाची दखल घेऊन चौकशी ईडीकडे सोपवली. त्यात साबांखा अधिकारी तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व चर्चिल आलेमाव यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी आता आज 22 जुलै रोजी न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार आहेत.

Related Stories

विजय हजारे स्पर्धेत आज गोव्याची सलामी बडोद्याशी

Amit Kulkarni

झुवारी अग्रो केमिकल्सतर्फे सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

Amit Kulkarni

गुळे परिसरात दोन ट्रक अपघात

Amit Kulkarni

मडगावातील सुलभ शौचालयाला सुक्या कचऱयाचा विळखा

Patil_p

म्हादई प्रत्यक्ष पाहणीवेळी कर्नाटकची दंडेलशाही

Patil_p

शैलेंद्रला काहीही झाल्यास सतीश धोंड, सदानंद तानावडे, प्रमोद सावंत जबाबदार

Patil_p
error: Content is protected !!