तरुण भारत

शाळांशी संबंधीत सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी  /सांखळी

Advertisements

राज्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांशी संबंधित सगळय़ांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. शाळेच्या संपर्कात येणाऱया सर्वाना लवकरच दुसरा डोस देण्याची तयारी सरकार करत आहे. राज्यातील 90 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ती समाधानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

 कोलगेट कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून सांखळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका देण्याचा कार्यक्रम काल मंगळवारी सांखळी आरोग्य केंद्रात झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिपादन केले.

 मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील सर्व शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक असून शिक्षकेतर कर्मचाऱयांचेही लसीकरण होणे आवश्यक आहे. या लोकांना दुसरा डोस 84 दिवसांऐवजी 30 दिवसांत देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या सर्वांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरु करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.

 कार्यक्रमात डॉ. उत्तम देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. विजय गुहे, रमेश पाटील, प्रशांत कामत, डॉ. जे डीसा, डॉ विकास कवळेकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, सांखळी पालिका सदस्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी कोलगेट कंपनीच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. शुभदा सावईकर यांनी सूत्रसंचालन केले,

Related Stories

कोरोना सक्रिय रुग्णांवर घरीच उपचार

Amit Kulkarni

ग्राहक मिळविण्याच्या स्पर्धेत हॉटेलच्या दरात मोठी कपात

Patil_p

साखळीतील सातेरी केळबाई देवीच्या कळसोत्सवाची सांगता

Amit Kulkarni

भाई शेवडे यांचा सत्कार हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस : उपमुख्यमंत्री बाबू आजगावक

Amit Kulkarni

स्पॅम्प पेपर दरवाढ विधेयकास राज्यपालांनी मान्यता देऊ नये

tarunbharat

ओटीटी मोठय़ा पडद्यांवरील आनंदाची अनुभूती निर्माण करू शकत नाहीत- चित्रपट वितरक अक्षय राठी

Amit Kulkarni
error: Content is protected !!