तरुण भारत

कसारा घाटात दरड कोसळली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऑनलाईन टीम / मुंबई : 


मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला. विशेष म्हणजे रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला आहे. कसारा घाटात नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.

Advertisements


मुसळधार पावसामुळे कसारा घाटातील रेल्वे रुळावर पाणी साचले तसेच दरड देखील कोसळल्याने रेल्वे रुळावरील खडी वाहून गेली. सध्या दरड उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल, सीएसएमटी-लातूर स्पेशल, सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल, सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल, सीएसएमटी-गडग स्पेशल, सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल, सीएसएमटी-हजूर साहेब नांदेड स्पेशल या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही ट्रेन अर्ध्यावर थांबवण्यात आल्या आहेत, तर ट्रेनचे मार्ग वळवण्यात आले आहेत. या सोबतच 24 लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

प्रशासक पदावर योग्य व्यक्ती आणि लोकशाही जिंकली

Patil_p

दादर भाजी मार्केटमध्ये आज नागरिकांची अलोट गर्दी

pradnya p

‘ते’ तीन आरोग्य निरीक्षक निलंबित

Shankar_P

पाकिस्तानमध्ये मागील चोवीस तासात 1356 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 57 हजार पार

pradnya p

प्लेगमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सावरकरांचे आदर्श रूप

triratna

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दीड लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!