तरुण भारत

फुलबाग गल्ली येथे रस्त्याची दुरवस्था

रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना समस्या

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शहरातील सर्वच रस्त्यांची वाताहत झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडलेले निदर्शनास येत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ात पाणी साचत असून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने समस्या निर्माण झालेली दिसून येत आहे. येथील फुलबाग गल्ली देशपांडे पेट्रोल पंपानजीक असलेल्या मार्गाची दूरवस्था झाल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

ओल्ड पी. बी. रोडवर अनेक व्यावसायिक दुकाने असल्याने या मार्गावर नेहमी वाहनधारकांची गर्दी असते. मात्र, या ठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे नागरिकांना सदर मार्गावरून जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खड्डय़ात साचलेले चिखलाचे पाणी एखादे वाहन गेल्यास अंगावर उडत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

येथील मार्गांवर अनेक मेकॅनिकलची दुकाने असल्याने दुरुस्तीसाठी दुकानांसमोर वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे अरुंद असलेल्या खड्डेमय मार्गातून  वाहनधारकांना वाट काढणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन येथील समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

पावसाळय़ापूर्वी लेंडी नाल्याची खोदाई पूर्ण करा

Patil_p

कचेरी गल्ली-शहापूर येथे रक्तदान शिबिर

Amit Kulkarni

बेळगावच्या उद्योगाची पूर्वपदाकडे वाटचाल

Patil_p

ता.पं.कार्यकारी अधिकाऱयांनी केली निराधारांना मदत

Patil_p

शिवसेनेची रुग्णवाहिका सीमाभागासाठी उपयुक्त ठरेल!

Amit Kulkarni

अरळीकट्टी क्रॉसजवळ दोन लाख रुपये जप्त

Omkar B
error: Content is protected !!