तरुण भारत

शिवसेनेने बुजविले स्वखर्चाने खड्डे

समर्थनगर येथे टाकण्यात आला मुरूम : नागरिकांतून समाधान

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

समर्थनगर मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे नागरिकांना ये-जा करण्यास कसरत करावी लागत होती. ते पाहून बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने तीन ट्रक माती टाकून खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत
आहे.

शहरातच असणाऱया समर्थनगर येथे रस्त्याअभावी परिसर चिखलमय बनला आहे. सततच्या पावसाने या चिखलात दिवसेंदिवस भर पडत चालली असल्याने नागरिकांचे येणे-जाणेही कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी वाहने घेऊन जाणे धोक्मयाचे ठरत असल्याने हा रस्ता करावा, अशी मागणी नागरिकांकडून अनेकवेळा लोकप्रतिनिधी व मनपाकडे करण्यात आली. परंतु मनपाने आतापर्यंत दुर्लक्षच केल्याने अखेर मंगळवारी तीन ट्रक मुरूम टाकून शिवसेनेने रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत.

यावेळी संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हा उपप्रमुख बंडू केरवाडकर, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ता जाधव, तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, चंद्रकांत कोंडुसकर, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, विनायक हुलजी, तानाजी पावशे, वैजनाथ भोगण, निरंजन अष्टेकर, राजू कणेरी, संजय चतूर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

कर्नाटक: एप्रिल-जूनमध्ये मद्य विक्रीत ३३ टक्के घट

triratna

अनोळखी तरुणीचा झोपेतच मृत्यू

Omkar B

मनपा घेणार आश्रय घरातील बोगस लाभार्थींचा शोध

Patil_p

आर्द्रा, पुनर्वसू कोरडा; पुष्याने तारले

Amit Kulkarni

महाराष्ट्र-कर्नाटकाला जोडणारी चन्नम्मा एक्स्प्रेस झाली पंचवीशीची

Patil_p

पशुसंजीवनी योजनेंतर्गत पशुपालकांपर्यंत सुविधा पुरविणार

Omkar B
error: Content is protected !!