तरुण भारत

कोल्हापूर : करवीर पश्चिम परिसरात धुवाधार, 25 गावांचा संपर्क तुटला

प्रतिनिधी /कसबा बीड

करवीर पश्चिम परिसरात धुवाधार पाऊस सुरु असल्याने महे-कसबा बीड व कोगे पूल पाण्याखाली गेले आहे. गेली दोन दिवस मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीपात्राच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होत आहे. आज सकाळी पाच वाजता करवीर तालुक्यातील कसबा बीड व कोगे पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. महे कसबा बीड दरम्यान पुलावरून होणाऱ्या जवळपास 25 गावाचा संपर्क तुटला आहे. कोगे- कुडित्रे व कसबा बीड- महे यादरम्यान या दोन्ही पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.

पावसाची संततधार सुरुच असल्याने पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ज्या गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते, त्यात भागांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पालन करून पुरग्रस्त लोकांना अलगीकरण करणे गरजेचे आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत 1 हजारांवर नवे रूग्ण

triratna

रामलिंग आळते येथील जल,माती अयोध्येला जाणार

Shankar_P

हातकलंगलेमधील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 30 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

triratna

कोल्हापूर : आपत्कालीन स्थितीत प्रशासनाचे वळीवडेकडे दुर्लक्ष का ?

triratna

संध्याकाळपर्यंत गृहमंत्री देशमुखांची विकेट

triratna

कनाननगरातील कुटुंबांना भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगेंकडून मदत

triratna
error: Content is protected !!