तरुण भारत

जिल्हा रुग्णालय आवारातील रस्त्यावर निसरड

रुग्ण-नातेवाईक घसरून पडण्याच्या घटना : तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे नागरिकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयातील समस्या पाहता नागरिकांची आणि रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयात ये-जा करण्याच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून रुग्ण व नातेवाईक रस्त्यावर घसरून पडत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिक सैरभैर झाले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणे अशक्मय असल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. पण रुग्णालयातील विविध समस्यांमुळे नागरिक व रुग्णांची गैरसोय होत आहे. कधी पाणी नाही, तर स्वच्छता नाही, तर आता पावसाळय़ात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्हा रुग्णालय आवारात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. याकरिता अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. अशातच येथील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन निसरड झाली आहे.

स्टाफची होणारी गैरसोय दूर करा

रस्त्यावरील निसरडीमुळे रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालयातील स्टाफलादेखील येथून ये-जा करणे मुश्कील बनले आहे. चिखलातूनच नागरिकांना मार्ग काढावा लागत असल्याने घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. जवळच प्रसूतीगृह असल्याने नागरिकांची ये-जा सुरू असते. पण या चिखलामुळे ये-जा करणारे नागरिक व रुग्ण घसरून पडत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील रस्त्याची तानडीने दुरुस्ती करून रुग्ण, नागरिक आणि स्टाफची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

पहिल्या रेल्वेगेटची दुरुस्ती

Amit Kulkarni

सिमेंट व्यापारी ते केंद्रीयमंत्री

tarunbharat

खानापूर बँकेचे संचालक मारुती पाटील यांची ‘तरुण भारत’ कार्यालयाला भेट

Amit Kulkarni

पदवीपूर्व कॉलेज सुरु करा, अन्यथा आंदोलन

Patil_p

मनोरंजनाची माध्यमे जबाबदारीने हाताळायल्या हवीत!

Patil_p

मण्णूर रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांत तीव्र संताप

Patil_p
error: Content is protected !!